पंकजा ताईंची काम करण्याची इच्छा आहे का? धनंजय मुंडे यांचा सवाल
पुणे : 2019 ला विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा पराभव झाला. त्यानंतर विधानपरिषदेच्या उमेदवारीतही त्यांना डावलण्यात आलं.त्यानंतर भाजपने त्यांना सक्रीय राजकारणातून दूर केल्याचं बोललं जाऊ लागलं. त्यातच आता येत्या मंत्रिमंडळ विस्तारात त्यांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यावर पंकजा ताईंची काम करण्याची इच्छा आहे का विचारायला हवं. असे बोलून राष्ट्रवादीचे नेतेधनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना सवाल विचारला.
धनंजय मुंडे आज पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी पत्रकारांबरोबर संवाद साधला. मराठवाड्यासह बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून अनेक ठिकाणी सोयाबीन कापूस यांसह तूर मूग उडीद अधिक खरीप पिकांचे प्रचंड मोठे नुकसान झालेले आहे.
शेतकऱ्यांना मदत नाही मिळाली अजून पंचनामे झाले नाहीत.सर्वात जास्त फटका विदर्भ मराठवाडा याला झाला, मंत्रिमंडळ विस्तार उशीर झाला पालकमंत्री उशिरा नेमले. अशी टीका धनंजय मुंडे शिंदे व फडणवीस सरकार वर केली.
धनंजय मुंडे म्हणाले,गेल्या वर्षीही अशी परिस्थिती झाली होती,आम्ही मदत केली,पण आता शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून चालणार नाही.असे धनंजय मुंडे म्हणाले.
राज्यात एवढं पीक नुकसान झालं आहे मात्र कुठलेच मंत्री दिसत नाहीत. अशी टीका मुंडे यांनी शिंदे व फडणवीस सरकारवर केली. दिवाळीमध्ये गरजूंसाठी शंभर रुपयांमध्ये राज्य सरकारकडून आनंदाचा शिधा देणार अशी घोषणा सरकारने केलेली होती. मात्र दिवाळी जवळ आल्यानंतरही अद्यापपर्यंत या वस्तू पुरेशा उपलब्ध झाल्या नसल्याचं समोर आलं आहे.शिधा भेटणार नाहीच नुसत्या गोड घोषणा सरकार करत आहे. असे धनंजय मुंडे म्हणाले.
