Thursday, May 28, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

‘स्वायत्त न्यायसंस्थे’वरील बदनामी कारक व असंवैधानिक वक्तव्यांचा निषेध… काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी

पुणे : बिल्कीस बानो प्रकरणी गुजरात सरकारला फटकार, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, कोरोना हाताळणे बाबत केंद्रास समज, आधार कार्ड सक्ती, लखनपुर शेतकरी हत्या प्रकरणी केंद्रीय मंत्र्याच्या मुलास जामीन नाकारणे या व अशा अनेक प्रकरणात सर्वोच्च न्यायालय संविधानास अनुसरून भुमिका बजावत असतांना, देशाच्या ‘सर्वोच्च व स्वायत्त न्याय-संस्थेविषयी’ गंभीर, बदनामीकारक व असंवैधानिक वक्तव्ये करून (लोकशाहीच्या ४थ्या स्तंभाची) प्रतिमा मलीन करण्याचा निंद्य प्रकार केल्याबद्दल केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजूजू यांचा काँग्रेस पक्ष तीव्र निषेध करत असल्याचे काँग्रेस राज्य प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी सांगितले.

न्यायव्यवस्थेचे कामकाज पारदर्शक नसुन (?), न्यायमुर्ती राजकारण, गटबाजी व पर्यायाने नियुक्त्यांमध्ये भेदभाव करत असल्याचा गंभीर व बेजबाबदार आरोप केंद्रीय कायदा मंत्री किरेन रिजीजू यांनी अहमदाबाद येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘साबरमती संवाद’ कार्यक्रमात बोलतांना उघडपणे काल रोजी केला आहे.

न्यायसंस्थेची हेतुपुरस्सर बदनामी करणारी गंभीर व बेजबाबदार वक्तव्ये, स्वतः केंद्रीय कायदेमंत्री असुनही किरण रिजूजू कशाचे आघारे (?) करतात असा प्रश्न ऊपस्थित करून, त्यांचेकडे काही तथ्य-पुरावे असतील तर कायदेमंत्री यांनी आरोपां पेक्षा संविधानात्मक कार्यवाही, मा राष्ट्रपती वा संसद वा मंत्रीमंडळाचे समोर तथ्य व पुरावे ठेवणे आवश्यक होते..!
किंबहुना, हे आरोप करण्यापुर्वी, “सर्वोच्च न्यायालयाच्या चार न्यायमुर्तींनी जनतेच्या न्यायालयात येऊन, माध्यमांसमोर “न्याय संस्थेवरील (अर्थात त्यांचे वरील) सत्ताधिशांचा दबाव असल्याची” कबुली-वजा जाहीर आरोप केल्याच्या घटनेचे ऊचीत स्मरण देखील केंद्रीय कायदेमंत्री किरण रिजूजू यांनी लक्षात ठेवण्याची गरज होती.. लोकशाही प्रणीत देशात सत्ताधाऱ्यांनीच ‘न्यायसंस्थेविषयी’ संशय वा अविश्वास व्यक्त करून, जनतेत संभ्रम पसरविण्याचे भाजपचे हे षडयंत्र आहे काय..(?) असा सावल ही ऊपस्थित केला.. भाजप च्या संविधानिक पदांवरील जबाबदार नेतेच् अशी तर्कावर आधारीत वक्तव्ये जाणीव पुर्वक का करत आहेत..? असा प्रश्न देखील काँग्रेस’ने ऊपस्थित करून, यातून न्यायसंस्थेची विश्वासार्हता कमी करून ‘केंद्र सरकार सर्वस्वी सर्वोच्च अधिकारी’ आहे, असे भासवण्याचा व जनतेत भिती, घबराट व संभ्रम पसरवण्याचा हेतुपुरस्सर प्रयत्न चालल्याचा आरोप ही प्रवक्ते गोपाळदादा तिवारी यांनी दिलेल्या निवेदनात पुढे केला आहे..

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading