Thursday, May 28, 2026
Latest NewsNATIONALTOP NEWS

कॉंग्रेसच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जुन खरगे

दिल्ली : काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे हे विजयी झाले आहेत. खर्गे यांना 7 हजार 897 मते मिळाली. तर शशी थरूर यांना 1072 मतेच मिळवता आली. त्यामुळे तब्बल 24 वर्षांनंतर कॉंग्रेसला गांधी परिवारा व्यतिरिक्त दूसरा अध्यक्ष मिळाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार मल्लिकार्जुन खरगे 26 ऑक्टोबर रोजी पदभार स्वीकारतील.

काँग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक जिकल्यानंतर मल्लिकार्जुन खरगे यांनी पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांचे आभार मानले.  माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, काँग्रेस अध्यपदाच्या निवडणुकीचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल मी पक्षाचे प्रतिनिधी, नेते आणि कार्यकर्ते व सोनिया गांधी यांचे आभार मानतो. सगळ्यांनी या लोकशाही प्रक्रियेत भाग घेऊन काँग्रेसला बळकट केलं आहे. गरीब कुटुंबात जन्मलेल्या कार्यकर्त्याला काँग्रेस अध्यक्ष बनवल्याबद्दल मी आभारी आहे.

प्रतिस्पर्धी व खासदार शशी थरूर यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, माझे साथी शशी थरूर यांना मी शुभेच्छा देतो. कारण निवडणुकीत आम्ही दोघे प्रतिनिधी म्हणून उभे होतो.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading