Saturday, August 29, 2026
Latest NewsMAHARASHTRA

संदिपान भुमरे यांच्या मावस भावाचा अपघाती मृत्यू

पुणे : राज्याचे रोजगार हमी मंत्री संदिपान भुमरे यांच्या मावस भावाचा आज एका अपघातात मृत्यू झाला. मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर हा भीषण आणि विचित्र अपघात झाला. अंबादास हरिश्चंद्र नरवडे असे अपघातात निधन झालेल्या भुमरे यांच्या  मावस भावाचे नाव आहे. तर त्यांच्यासोबत असलेले चौघेजण गंभीर जखमी झाले. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. मंत्री संदिपान भुमरे यांचे मावस बंधू अंबादास हरिश्चंद्र नरवडे हे औरंगाबाद जिल्ह्यातील पाचोडचे रहिवाशी आहेत. ते आपल्या काही सहकाऱ्यांसह इनोव्हा गाडीतून मुंबईवरून पुण्याच्या दिशेने येत होते. पहाटे 4 वाजता कामशेतजवळ इनोव्हा गाडील टेम्पोला मागून धडकली. त्यामुळे इनोव्हा डिव्हाडरवर आदळली. त्याचवेळी मागून आलेल्या एका चारचाकी वाहनाने आणि ट्रकने एकामागोमाग धडक दिली. अचानक झालेल्या या विचित्र अपघतामुळे नरवणे यांचा जागीच मृत्यू झाल्याचं वृत्त. अंबादास नरवडे यांच्यासोबत त्यांचे मित्रं आणि गाडी चालक होता. हे दोघेही अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर तळेगावच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे पैठण तालुक्यावर दु:खाचं सावट पसरलं आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading