बालगंधर्व कला अकादमी रचतेय रंगभूमीवर नवा इतिहास; राज्यस्तरीय भव्य एकपात्री अभिनय स्पर्धा संपन्न
मुंबई : बालगंधर्व कला अकादमिच्या वतीने मुंबई येथील रवींद्र नाट्य मंदिर येथे एकपात्री अभिनय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आजवरच्या इतिहासात सर्व जुन्या चालीरितींना बाजूला सारत राष्ट्रीय एकात्मतेची भावना आणि संदेश देऊन अशा अनोख्या आणि विशेष पद्धतीने कार्यक्रमांची सुरुवात करणारी बालगंधर्व कला अकादमी ही या देशातील कदाचित पहिलीच आणि एकमेव संस्था आहे .या एकपात्री स्पर्धेमध्ये महाराष्ट्र भरातुन स्पर्धक सहभागी झाले होते.
यावेळी कार्यक्रमाची सुरुवात ही भारतीय जवानांच्या बलिदानाच्या स्मरणार्थ मानवंदना देऊन भारतीय राष्ट्रगीताने करण्यात आली रंगभूमीच्या इतिहासातील सर्वाधिक एक्कावन्न स्पर्धकांना महाअंतिम फेरीमधे निवड करण्यात आली. आजवरची सर्वात भव्य आणि महाअंतिम फेरीत ५१ फायनल स्पर्धक कलावंत असलेली ही पहिलीच स्पर्धा आहे. जिथे अनेकजण आर्थिक फायद्यांसाठी कुठेही मिळेल तिथे स्पर्धा आयोजित करतात अशा सिनेसृष्टी आणि रंगभूमीवरील कलेचा दर्जा र्हास होत असताना बालगंधर्व कला अकादमी सारखी एक सर्वोत्तम आणि विश्वासार्ह अकादमीने कलावंतांसाठी रविंद्र नाट्य मंदिर सारख्या मोठ्या आणि ऐतिहासिक नाट्य मंदीराची दारे उघडली आणि एक भव्य आणि हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून दिले असल्याचे आयोजक संचालक, किशोर कुमार यांनी सांगितले .
या स्पर्धेचे परीक्षण जेष्ठ अभिनेत्री श्रिमती शकुंतला नरे व लेखक दिग्दर्शक राजा अत्रे यांनी केले तसेच या स्पर्धेत महाअंतिम फेरीमध्ये प्रथम क्रमांक प्रांजल जाधव (जिजाऊ), द्वितीय क्रमांक -प्रतिभा गायकवाड (सुन), तृतीय क्रमांक निशांत जाधव (बाप गेल्याची कर्म कहाणी) यांनी मिळवला. विशेष उत्तेजनार्थ पारितोषिके सेशा हिंदळेकर (लक्ष्मी) सिद्धेश कुंभार (कचरेवाला), उत्तेजनार्थ पारितोषिके कृपा गायकवाड (शेतकर्याची मुलगी), रायन सत्तेगिरी (क्रिकेटर), विहान शेडगे (आई), तेजस नाईक (कलावंत), प्रगती जगताप (गोजिरी), प्रोत्साहनपर उत्तेजनार्थ वैष्णव पाटील (शेतकरी व्यथा), हर्षिका वर्तेकर (द्रौपदी), दृष्टी गुप्ता (झाशीची राणी), युवराज राळे (छत्रपती शिवाजी महाराज), सेजल जाधव (शुन्याचा पाढा)अशी बक्षिसे देण्यात आली .तसेच सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांचा प्रशस्ती पत्रक देऊन गौरवन्यात आले. या स्पर्धेचे आयोजन किशोर कुमार यांनी केले. विषेश अतिथी म्हणून विजय गोखले हे दिग्गज अभिनेते लाभले.
