Monday, June 15, 2026
Latest NewsPUNE

मुसळधार पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागाची राष्ट्रवादीकडून पाहणी

पुणे : यावर्षीच्या पावसाने पुण्यातील पाच वर्ष सत्तेवर असलेल्या भाजपच्या भष्ट्राचाराची पोलखोल केली.  परंतु यामुळे पुणेकरांना मात्र अतोनात हाल सहन करावे लागले. आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने पुण्यातील काही भागांमध्ये परवाच्या पावसामध्ये झालेल्या नुकसानाची पाहणी केली.

पुणे स्टेशन समोरील भुयारी मार्गाच्या आतील असलेल्या गाळेधारकांचे परवाच्या पावसामुळे अत्यंत नुकसान झाले आहे.  त्यांचा माल पावसामुळे खराब झालेला आहे तसेच वारंवार प्रशासनास विनंती करून सुध्दा तेथे कोणीही मदतीस आलेले नाही. स्वच्छते करीताही खुप वेळा विनवण्या कराव्या लागल्या त्यांच्या समस्या जाणून घेण्याकरिता अद्यापही कोणी आलेले नाही , महानगरपालिकेच्या वतीने याठिकाणी भाडे  घेतले जाते. मात्र त्यांच्या समस्यांकरता नीट लक्ष दिले जात नाही अशी तक्रार तेथील सर्व व्यापाऱ्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने केली.

सदर शिष्टमंडळात प्रवक्ते अंकुश काकडे, प्रदीप देशमुख ,दिपाली धुमाळ ,किशोर कांबळे , मयुर गायकवाड , अजिंक्य पालकर महेश हांडे , शशिकांत जगताप , गणेश नलावडे संतोष बनसोडे इत्यादी प्रमुख उपस्थित होते

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading