Thursday, May 28, 2026
ENTERTAINMENTLatest News

“…मग टास्कमध्ये FAIR चं बोलू नका” – तेजस्विनी लोणारी

बिग बॉस मराठी सिझन चौथा – दिवस १७ 

आज घरात तेजस्विनी, अमृता देशमुख, योगेश आणि अमृता धोंगडे अपूर्वा बद्दल चर्चा करताना दिसणार आहेत. ज्यामध्ये तेजस्विनीला अपूर्वाचं वागणं खटकतं आहे आणि तिचे म्हणणे आहे अपूर्वा unfair खेळते. तेजस्विनी सांगताना दिसणार आहे, “अपूर्वाचा काय सिन आहे कळतं नाही मला. काय होतं हे लोक घरात जे वागतात त्याचं रिफ्लेक्शन टास्कमध्ये येतं आणि मग टास्कमध्ये माझ्या डोक्यात ते सगळं असतं कि, तुम्ही सगळीकडे इतकं unfair वागता आणि मग टास्कमध्ये FAIR चं बोलू नका. अमृता धोंगडेचे म्हणणे आहे, तुमचं जर वैर असेल एखाद्याशी कि तुम्हांला एकाला कॅप्टन बनूच द्यायचे नाहीये तर तुम्ही तशी स्ट्रॅटेजि प्लॅन करता. तेजस्विनी म्हणाली, मेघताई पण म्हणत होत्या, कि भांडी लावायला आली असं कधी केले नाही ना किती पण चुका केल्या तरी. अमृता देशमुखचं म्हणणं आहे, मेघा ताईचं लगेच असतं इथे काही बिनसलं कि ती लगेच किचनमध्ये सांगते.

बघूया पुढे काय होईल ते घरात. बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि – रवि रात्री ९.३० वा.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading