जिल्हा नियोजन समिती बैठकीला अजित पवार अनुपस्थित, चंद्रकांत पाटील म्हणाले
पुणे: जिल्हा नियोजन समितीची बैठक आज पार पडली. या बैठकीला अजित पवार यांची अनुपस्थिती जाणवली.अजित पवार पालकमंत्री असताना चंद्रकांतदादा पाटीलही या बैठकीकडे फिरकत नव्हते. आज अजित पवार आले नाहीत, त्यामुळे डीपीसीच्या बैठकीत एकच दादा असा काही नियम आहे का? अशी चर्चा विधानभवनात रंगली होती. त्यावर मी तेव्हा प्रदेशाध्यक्ष असल्यामुळे खूप फिरावं लागायाच, त्यामुळे येता यायचं नाही. ऑनलाईन बैठकांना असायचो. अजितदादा नगरला गेले त्यामुळे ते आले नाहीत. डीपीसीमध्ये एकच दादा असतील, असं काही आमचं ठरलेलं नाही. असे स्पष्टीकरण भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री व पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी ऋतुजा लट्टे यांची पोटनिवडणुकीत बिनविरोध निवड करण्याची मागणी केली, तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले. त्यामुळे भाजपने या निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यावर प्राप्त परिस्थिती पाहून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी अंधेरी पोट निवडणुकीसंदर्भात निर्णय घेतलाय, मात्र हा निर्णय इतर निर्णयांशी जोडता येणार नाही. अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.
महाविकास आघाडी सरकारने जिल्हा नियोजन समितीच्या कामांना एक हजार 58 कोटींच्या कामांना स्थगिती दिली होती.आधीच्या सरकारने एक हजार 58 कोटींच्या कामांना स्थगिती दिली होती, या कामांची शहानिशा करून त्याचा फायनल आराखडा तयार करणार, आजपासून 27 तारखेपर्यंत विधानसभा निहाय चार दिवस जिल्हाधिकारी कार्यालयात बसून कामं फायनल केली जाणार.जिल्हाधिकारी आणि मी एकत्र बसून 1 तारखेला विकास आराखडा तयार करणार. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
पुणे शहरातदिवाळीत वाहतूककोंडी होणार आहे. या मुळे पोलिसांना दंड करण्यात पुन्हा वेळ जातो .चलन फाडण्यात पुन्हा वेळ जातो, त्यामुळे चलन फाडु नका असं सांगण्यात आलंय. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
शहरात दोन दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस झाल्यामुळे शहरातील मध्यवर्ती भागात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे महापालिकेतील सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खंडाजंगी पाहायला मिळाली. त्यावर पुण्यातील पूर परिस्थीती निर्माण झाली होती, त्यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले आहेत. आहे.असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
