Thursday, May 28, 2026
Latest NewsPUNE

कुठली काम रद्द करणार नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन मला दिले -दत्तात्रय भरणे

पुणे:एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून राष्ट्रवादी पक्षाने घेतलेल्या अनेक निर्णयांवर बंदी घालण्यात आली. अशातच पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारकडून 850 कोटी रुपयांचा निधी रोखण्यात आला आहे. त्यावर राष्ट्रवादी आणि भाजप मध्ये निधी वरून अखेर समझोता झाला आहे.पूर्वी झालेल्या सर्व कामांना प्रश्न विचारला. कुठली काम रद्द करणार नसल्याचं चंद्रकांत पाटील यांनी आश्वासन मला दिले आहे.अशी माहिती राष्ट्रवादीचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.

आज जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पार पडली. दत्तात्रय भरणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. दत्तात्रय भरणे म्हणाले, अजित पवार अधिकचा निधी आणू शकतात. आधीचा रद्द न करता ज्यादा निधी चंद्रकांत पाटील यांनीआणावा. असे भरणे म्हणाले. अजित पवार या बैठकीला का आले नाहीत. यावर भरणे म्हणाले,अजित पवार पूर्व नियोजित कार्यक्रमामुळे आले नाहीत. असे दत्तात्रय भरणे म्हणाले. पुणे जिल्ह्याच्या निधी संदर्भात भाजप दुधावर करत असल्याचा आरोप अजित पवार यांनी केला होता. त्यावर पुणे जिल्ह्याचा निधी संदर्भात अखेर एकमत झाल्याचा दावा . दत्तात्रेय भरणे यांनी केला आहे

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading