सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पार्टीचे ठेवले नवीन नाव भारतीय जनता लॉन्ड्री
पुणे : भाजपने येत्या काळात बारामती ताब्यात घेण्यासाठी कंबर रसली त्यामुळे राष्ट्रवादी व भाजपमध्ये आरोप प्रत्यारोपे सारखे होत आहेत. त्यात राष्ट्रवादीचे नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भारतीय जनता पार्टीला भारतीय जनता लॉन्ड्री झाला आहे. सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना भाजपवर केली आहे.
शंभूराजे देसाई , विजय शिवतारे यांनी शिवसेनेचे वाटोळ शरद पवार यांनी केलं असा आरोप केला आहे. त्यावरशिवतारे म्हणाले ,ते बरोबर आहे गेल्या 55 वर्षात महाराष्ट्रात जे काही होतं त्याला पवार जबाबदार आहेत.त्याची आम्हाला सवय झाली आहे. असे प्रतिउत्तर सुप्रिया सुळे यांनी विजय शिवतारे यांना दिले.
बोलताना सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना देखील खोचक टोला लगावला आहे. भाजपला ज्यांनी खऱ्या अर्थाने वाढवण्याचं काम केलं ते कार्यकर्ते आज कुठे आहेत? मात्र त्यांच्या जागी आता आमच्या पक्षातून भाजपमध्ये गेलेले नेते आहेत. त्यांना भाजपमध्ये एवढा मान-सन्मान मिळत आहे, हे पाहून बरं वाटलं. आमच्याकडे देखील त्यांना काही कमी नव्हतं. मात्र बर झालं त्यांना दोन्हीकडं देखील सन्मान मिळत आहे.असं सुप्रिया सुळे या म्हणाल्या आहेत.
अंधेरी पूर्व येथील आमदार रमेश लटके यांचे निधन झाल्याने त्यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यांचे दोन्ही राजीनामे नियमात बसत नाहीत, असे सांगत ही बनवाबनवी केली जात असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात आला होता.अंधेरी पोट निवडणुकीत जे राजकारण होत आहे ते खूप दुर्दैवी वाटतं.एखाद्या कुटुंबातला करता पुरुष जेव्हा जातो आणि त्याच्या पत्नीला जर उमेदवारी दिली तर इतक्या टोकाची भूमिका घेणं चुकीचं.हेभारतीय संस्कृतीत बसत नाही. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
वाढत्या महागाईवर सुप्रिया सुळे म्हणाल्या,गेल्या दोन-तीन वर्षात जी महागाई वाढली आहे त्यामुळे आता तुम्ही दिवाळीचा फराळ व्हाट्सअप वर पाठवा.वाढत्या महागाईचा विचार भारतीय जनता लॉन्ड्रीने करावा. असे आवाहन सुप्रिया सुळे यांनी भाजपला केले आहे.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला भरपूर प्रतिसाद भेटत आहे .7 नोव्हेंबरला भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात येणार आहे. राष्ट्रवादी सहभागी होणार का. त्यावर सुळे म्हणाल्या,संविधानानुसार सगळ्यांना तो अधिकार विरोधक असलाच पाहिजे , काँग्रेस देश जोडण्याचा प्रयत्न करत आहे आणि या कामात आमचं त्यांना सहकार्य नक्की राहील . असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व भाजपचे नेते वारंवार म्हणत आहे .की भाजपा फक्त देशात पक्ष राहणार आहे.भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असू द्या किंवा देशाचे अध्यक्ष असू द्या हे सगळे दडपशाही आहेत.संविधानानुसार एक देश अनेक पक्ष पाहिजे. हा देश संविधानाने चालतो अशी टीका सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केली आहे.
