मला फक्त तीन महिन्यात ५० खोके दिसले सुप्रिया सुळे यांचा शिंदे व फडणवीस सरकारला टोला
पुणे : शिंदे व फडणवीस सरकारला ३ महिने पूर्ण झाले असून त्यांच्या तीन महिन्याच्या कामाबद्दल नेत्यांनी व जनतेने प्रतिक्रिया दिली आहे. त्यावर मला तीन महिन्यात फक्त पन्नास खोके दिसले .असा टोला राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे व फडणवीस सरकारला लगावला.
महा विकास आघाडीचे सरकार असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना काळात व अन्य दिवशी फेसबुक वरून जनतेची संवाद साधायचे. त्यावरून भाजपने उद्धव ठाकरे यांच्यावर भरपूर टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पण उद्धव ठाकरे सारखे यांच्यासारखे करतात का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. त्यावर सुळे म्हणाल्या,मुख्यमंत्री मंत्रिमंडळ मंत्रालयात कधी दिसतच नाहीत.ना कधी ते शेतकऱ्याच्या बांधावर जातात. अशी टीका सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली.
पुण्यात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसामुळे पुण्यातील मध्यवर्ती भागातील नद्यांना नदीचे स्वरूप आले होते. त्यामुळे भाजप व राष्ट्रवादीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले.
पुणे बदलतंय. ही भाजपची टँग लाईन कालच्या पावसाळी पुरात पुणेकरांना अनुभवायला मिळालीच आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला आहे. भाजपने या शहराचं वाटोळं केलं. ट्राफिकची तर पुरती वाट लावून टाकली. असा आरोप सुप्रिया सुळे यांनी भाजपवर केला.
पुण्यात सेक्सटॉर्शन चे एकाच आठवड्यात दोन बळी गेले आहेत त्यामुळे पुणे शहर हादरले आहे.
हे खूप दुर्दैवी आहे समाज माध्यमांचा वापर चुकीच्या गोष्टीसाठी होता कामा नये. अशी प्रतिक्रिया सुप्रिया सुळे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँक घोटाळय़ाप्रकरणी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. या प्रकरणी मूळ तक्रारदाराने निषेध अर्जाद्वारे घोटाळय़ाशी संबंधित उपस्थित केलेले मुद्दे आणि अंमलबजावणी संचालनालयाने दाखल केलेल्या अहवालाच्या आधारे प्रकरणाचा पुढील तपास सुरू केल्याची माहिती आर्थिक गुन्हे विभागातर्फे शनिवारी विशेष न्यायालयात देण्यात आली.रिपोर्ट न पाहता लोकांवर खोटे नाटे आरोप केले जातात. असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
