fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पोलीस भरती बाबत चंद्रकांत पाटील यांनी केली मोठी घोषणा

पुणे : पोलीस खात्यात भर्ती व्हावं. खाकी वर्दी आपल्या अंगावर असावी. असं अनेक तरुणांचं स्पप्न असतं. सरकार दरवर्षी पोलीस भरतीसाठी जागा काढत असतात. त्यावर २० हजार पोलीस भरती निघाली. त्याचबरोबर २०००हजारो जागा निघाल्या. आता १००० जागांसाठी पोलीस भरती होणार आहे. अशी घोषणा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली आहे. देशाच्या स्वातंत्र्य्याला पंचाहत्तर वर्षे पुर्ण होतायत. त्यामुळे 75 हजार जागा भरण्याचा आमचा संकल्प आहे. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनीज्येष्ठ व्यंगचित्रकार आर के लक्ष्मण यांच्या आठवणींना उजाळा दिला. आर के लक्ष्मण यांनी त्यांच्या व्यंगचित्रातून समाजात जागरूकता निर्माण केली आहे. नेहमी कॉमन मॅन त्यांच्या व्यंगचित्राच्या केंद्रस्थानी राहिला आहे. व्यंगचित्रं हे आरके लक्ष्मण यांच्या व्यंगचित्रामुळे अमर झाले. आजही अनेक वृत्तपत्रात त्यांचे कार्टुन येत असतात. जवळपास 70 वर्ष त्यांनी हे काम केलं आहे. हे सगळ अजरामर आहे, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
कोविडच्या काळात सुरुवातीला आपल्याला प्रत्येक गोष्ट बाहेरून आणावी लागत होती. पण मोदींच्या दुरदृष्टीमुळे आपल्याला सर्व गोष्टी मिळाल्या. एवढंच काय लस आपण निर्माण केली आणि ही लस आपण जगाला दिली, असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.
शुल्क वाढ रद्द करण्यासह अन्य तीन मागण्यांसाठी पुकारण्यात आलेले सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील आंदोलन अखेर चौथ्या दिवशी स्थगित करण्यात आले आहे.विद्यापीठातील शुल्क वाढीबाबत लवकरच आम्ही मार्ग काढू. असे आश्वासन चंद्रकांत पाटील यांनी दिले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading