अंधांच्या आयुष्यातील अंधार समाजाने दूर करावा- निलम सेवलेकर
पुणे :अंध ,अपंग यांच्या आयुष्यातील अंधार समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन दूर केला पाहिजे असे मत फिक्की महीला आघाडीच्या अध्यक्षा नीलम सेवलेकर यांनी व्यक्त केले .आज जागतिक पांढरी काठी दिनानिमित्त फिक्की महिला आघाडी व द पूना स्कूल अँड होम ब्लाइंड बॉईज (पुणे अंध शाळा मुलांची) यांच्या संयुक्त वतीने जनजागृती अभियान राबविण्यात आले . यावेळी सेवलेकर बोलत होत्या.
यावेळी अंध विद्यार्थांच्या सह महिला उद्योजिका यांनी आपल्या डोळ्यावर पट्टी बांधत अंध मुलांना विश्वास व प्रेरणा देत हातात पांढरी काठी घेऊन रॅलीत सहभागी झाल्या होत्या .यावेळी मुलांनी जागतिक पांढरी काठी दिनाचा विजय असो , काळया ढगात वीज आहे ,अंधारातही दिव्याचे तेज आहे …अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या . या नंतर मुलांना फिक्की संस्थेच्या वतीने खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी जागतिक पांढरी काठी दिनाचे महत्त्व संस्थेचे श्रीकृष्ण शेवाळे यांनी सांगितले . हा दीन अंधांना अधिकार मिळवून देणारा आहे .रस्ता असो अथवा गर्दीत पहिला अधिकार पांढरी काठी असणारा म्हणजेच अंध व्यक्तीला आहे .असे त्यांनी सांगितले .
या कार्यक्रमास फिक्की महिला आघाडीच्या अध्यक्षा नीलम सेवलेकर ,सचिव सोनिया राव ,मुख्याध्यापक राजाराम जगताप ,संस्थेचे प्रशासन अधिकारी श्रीकृष्ण शेवाळे तसेच अंध विद्यार्थी ,शिक्षक व महीला उद्योजिका मोठ्या संख्येने सहभागी झाले होते