Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

महापालिका, जिल्हापरिषद,पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेडचा 17 ऑक्टोंबर रोजी कार्यकर्ता मेळावा


पुणे:संभाजी ब्रिगेड पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वा. पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड पुणे येथे कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन आगामी महानगरपालिका, जिल्हापरिषद,पंचायत समितीच्या निवडणुकीचे रणशिंग संभाजी ब्रिगेड फुंकणार आहे, तसेच शहर व जिल्ह्यात घर तिथे कार्यकर्ता ही मोहीम राबवण्यात येणार आहे, यावेळी सामाजिक, शैक्षणिक, उद्योग, व पत्रकारीकेच्या क्षेत्रात, उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या वेक्तींचा सन्मान करण्यात येणार आहे, १७ ऑक्टोबर रोजी होणारा संभाजी ब्रिगेड चा कार्यकर्ता मेळावा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पुणे शहर व जिल्हा पदाधिकारी मेहनत घेत आहेत,

संभाजी ब्रिगेड कार्यकर्ता मेळाव्या मध्ये मोठ्या प्रमाणात इतर पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी संभाजी ब्रिगेड मध्ये जाहीर पक्ष प्रवेश करणार आहेत, सध्याचे राजकारण आणि संभाजी ब्रिगेड ची रणनीती याच्यावर संभाजी ब्रिगेड च्या वतीने एल्गार करण्यात येणार आहे, या संदर्भात संभाजी ब्रिगेड पुणे शहर व जिल्ह्याच्या वतीने महानगरध्यक्ष अविनाश मोहिते, उत्तर जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, मध्य जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, यांच्या प्रमुख उपस्थितीत, पत्रकार भवन नवी पेठ येथे पत्रकार परिषद घेण्यात आली, यावेळी जिल्हा सचिव निलेश ढगे, तेजस्विनी पवार, शहर सचिव संदीप कारेकर, उपाध्यक्ष अतुल येवले, जोतिबा नरवडे, अनिल बोटे, मावळ लोकसभा कार्याध्यक्ष दिनकर केदारी, जिल्हा कार्याध्यक्ष साजिद सय्यद, डॉ. कुमार गायकवाड, तालुकाध्यक्ष शिवाजी पवार,वाहतुक आघाडी उपाध्यक्ष विजय कदम, आदी पदाधिकारी उपस्थित होते,

संभाजी ब्रिगेड च्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी १७ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.३० वा. पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन घोले रोड पुणे येथे पुणे शहर व जिल्ह्यातुन हजारोंच्या संख्येने उपस्थित राहा असे आवाहन अविनाश मोहिते, चंद्रशेखर घाडगे, उत्तम कामठे यांनी केले,

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading