पीएमडीटीए-आयकॉन- सोलिंको ओम दळवी मेमोरीयल ब्रॉन्झ सिरिज स्पर्धेत 70 खेळाडूंचा सहभाग
पुणे : पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना (पीएमडीटीए) यांच्या तर्फे केपीआयटी व सोलिंको यांच्या संलग्नतेने 8 व 10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटातील पीएमडीटीए-आयकॉन- सोलिंको ओम दळवी मेमोरीयल ब्रॉन्झ सिरिज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा 15 व 16 ऑक्टोबर 2022 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेत एकूण 70 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. 8,10 वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात होणारी ही स्पर्धा महाराष्ट्र पोलिस टेनिस जिमखाना, औंध येथे होणार आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.
