Thursday, June 18, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

21 ते 31 ऑक्टोबर, दरम्यान एसटीची 10 टक्के हंगामी भाडेवाढ.

शिवनेरी व अश्वमेध सेवेला भाडेवाढीतून वगळले.

मुंबई :एसटी महामंडळाच्या परिवर्तनशील भाडेवाढ सुत्रानुसार गर्दीच्या हंगामात महसुल वाढीच्या दृष्टीने 30 टक्क्यापर्यत हंगामी भाडेवाढ करण्याचा अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटीला दिला आहे. त्यानूसार दरवर्षीप्रमाणे या हंगामातही दि.20.10.2022 व 21.10.2022 रोजीच्या मध्यरात्री 00.00 नंतर प्रवास सुरु करणा-या प्रवाशांना सुधारित 10 टक्के वाढीव दराने भाडे आकारणी करण्यात येईल. ही भाडेवाड 31 ऑक्टोबर, 2022 पर्यत राहील. सदर भाडेवाढ साधी (परिवर्तन), निमआराम (हिरकणी), शिवशाही (आसन) व शयन आसनी बसेसला लागू राहील. *शिवनेरी व अश्वमेध या बसेसला ही भाडेवाड लागू राहणार नाही.* ज्या प्रवाशांनी आगाऊ आरक्षण केले आहे , त्या प्रवाशाकडून वाहकाव्दारे आरक्षण तिकीट दर व नवीन तिकीट दर यातील फरक घेण्यात येईल.

तथापी, ही भाडेवाढ एस.टी. च्या आवडेल तेथे प्रवास तसेच मासिक/त्रैमासिक व विदयार्थी पासेसना लागू करण्यात येणार नाही.

1 नोव्हेबर पासून भाडेवाढ संपुष्टात येऊन, नेहमी प्रमाणे तिकीट दर आकारले जातील असे एसटी. महामंडळाकडून कळविण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading