पुण्यात मुसळधार पाऊस रस्त्यांना नदीचे स्वरूप
पुणे : मागील आठवड्याभरापासून मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. . आज दुपारनंतर पुण्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली.त्यामुळे पुणेकरांची भलतीच तारांबळ उडाली. पुण्यातील रस्त्यांना काही भागात नदीचे स्वरूप आले बघायला भेटले.
आज शुक्रवारी दुपारी तीननंतर पुणे शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यात जंगली महाराज कोथरुड, कर्वेनगर, नळ स्टॉप, डेक्कन, धानोरी, विश्रांतवाडी, वनाज, सिंहगड रोड भागातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले बघायला भेटले.
रस्त्यावर तर दोन-तीन फूट पाणी साचल्यानं या रस्त्यावर वाहनांची मोठी तारांबळ ऊडत आहे . त्या मुसळधार पावसाचा फटका शाळेतील मुलांनादेखील या पावसाचा फटका बसला आहे.
दरम्यान, येत्या आठवड्यात पावसाचा जोर कमी होत जाऊन परतीच्या पावसाचा प्रवास सुरु होतो का, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
