fbpx
Monday, June 17, 2024
Latest NewsPUNE

‘प्रोत्साहन’ : दिव्यांग व्यक्तींच्या विशेष कलात्मक वस्तूंचे प्रदर्शन

पुणे : विशेष व्यक्तींना मदत करण्याबरोबरच समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी काम करणा-या पुण्यातील समविचारी मैत्रिणींनी एकत्र येत प्रोत्साहन २०२२ या प्रदर्शनाचे आयोजन केले आहे. शनिवार, दिनांक १५ ते रविवार, दिनांक १६ आॅक्टोबर रोजी सकाळी १० ते ८ यावेळेत कर्वे रस्त्याजवळील अश्वमेध हॉल येथे हे प्रदर्शन होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागातील दिव्यांग व्यक्ती आणि संस्था या प्रदर्शनात सहभागी होत आहेत,अशी माहिती आयोजिका रेखा कानिटकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पत्रकार परिषदेला रंजना आठल्ये, आरती पटवर्धन, माधुरी पाटणकर, गीता पटवर्धन उपस्थित होत्या.

प्रदर्शनाचे उद््घाटन आंतरराष्ट्रीय कीर्तीची विशेष जलतरणपटू गौरी गाडगीळ (डाऊन सिंड्रोम) एम.ए. सोशिओलॉजी, स.प.महाविद्यालय हिच्या हस्ते होणार आहे. फक्त दिव्यांग व्यक्तिंचाच सहभाग असलेल्या या प्रदर्शनात त्यांच्या उपयुक्त कलात्मक वस्तू आणि खाद्यपदार्थ यांचे प्रदर्शन व विक्री केली जाते. तसेच त्यांच्या कलागुणांचे सादरीकरण हे या प्रदर्शनाचे वैशिष्ट्य आहे. दिव्यांग व्यक्ती, त्यांच्यासाठी काम करणा-या संस्था आणि सामान्य नागरिक यांच्यात परस्पर संवाद व सहकार्य स्थापन करणे, हा या मागचा उद्देश आहे.

रंजना आठल्ये म्हणाल्या, यंदा प्रदर्शनात १० संस्था आणि १८ ते ८० वयोगटातील दिव्यांगांचे २५ वैयक्तिक स्टॉल्स असणार आहेत. शिर्डी साईबाबा अंध वृध्द महिलाश्रम, संवाद – लोणावळा, नंदनवन, स्मित फाउंडेशन, आयडियल इनोव्हेटिव्ह ट्रस्ट(अंध) इत्यादी संस्था सहभागी होणार आहेत.

साई गुरू संस्थेतील दृष्टिहीन मुली विविध वस्तू तयार करण्याचे तसेच शिर्डी साईबाबा अंध वृध्द महिला वायरचे बास्केट, मण्यांचे शोपीस तयार करण्याचे प्रत्याक्षिक सादर करणार आहेत. दृष्टिहीन व्यक्ती भाजी चिरणे, पोळी लाटणे याचे प्रात्यक्षिक दाखवणार आहेत. दिव्यांगाना सक्षम करणे हाच प्रदर्शनाचा मुख्य उद्देश आहे. प्रदर्शनाला प्रवेश विनामूल्य असून पुणेकरांनी मोठया संख्येने प्रदर्शनाला भेट द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading