fbpx

अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा महिला आघाडीच्या वतीने महाभोंडला

पुणे : नवरात्र विशेष निमित्त अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ पुणे जिल्हा महिला आघाडी च्या वतीने नवरात्री निमित्त महा भोंडल्याचे आयोजन करण्यात आले. आपले सण, उत्सव, परंपरा जपण्याचे काम यनिमित्ताने करण्यात आले, कार्यक्रमा मध्ये महिलांचे सामुदायिक श्री सुक्त पठण, अनेक कुमारीकांचे पाद्यपूजन करण्यात आले.
यंदाचा बहुचार्चित नारी शक्ती सन्मान पुरस्कार प्रा निवेदिता एकबोटे यांना शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल देण्यात आला. प्रसिद्ध सिने अभिनेत्री सौ वेदांगी कुलकर्णी – तिळगूळकर यांना नारी शक्ती विशेष पुरस्कार देण्यात आला.
आज सुमारे दोनशे पेक्षा जास्त महिला व पुरुष सभासदांनी पारंपरिक वेषात एकत्रित भोंडला व दांडिया खेळांचा आनंद घेतला.उत्कृष्ट वेशभूषासाठी पुरस्कार देण्यात आले.
आजच्या या यशस्वी कार्यक्रमाचे आयोजन महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सौ केतकी कुलकर्णी यांनी केले, पुणे जिल्हा अध्यक्ष मंदार रेडे, लक्ष्मीकांत धडफळे, सत्यजीत कुलकर्णी, कमलेश जोशी, वृषाली शेकदार, दीपिका बापट आवर्जून उपस्थित होते.
शिल्पा महाजनी,आकांक्षा देशपांडे, रोहिणी ढोले, जयश्री घाटे, नेहा तिळगूळकर, शैला सोमण, ऋचा पाठक, साधना सोहोनी , रसिका जोशी, धनश्री धडफले, वेदिका सदावर्ते व अनेक महिला पदाधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले, माधवी पानसरे यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

%d bloggers like this: