fbpx
Friday, December 8, 2023
BusinessLatest News

मिलेनियल्सची भांडवली बाजारपेठांशी ओळख

मागील काही वर्षांमध्ये भारतीय शेअर बाजार विविध प्रकारच्या गुंतवणूकदारांकडून गुंतवणूकीने भरगच्च झाला आहे. शेअर बाजारातील गुंतवणूकींमध्ये गुंतवणूकदारांचा तुलनेने वेगवान प्रवास असल्याचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे मिलेनियल्सची भूमिका हे आहे. तरूण गुंतवणूकदारांनी प्रामुख्याने गुंतवणूकदार खात्यातील वाढीला चालना दिली आहे. समभाग गुंतवणूकीतील मिलेनियल्सचे एकूणच वाढते स्वारस्य भारताच्या भांडवली बाजारांमध्ये आणखी वाढू शकते. एंजल वन लिमिटेडचे चीफ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी यांनी स्मार्ट गुंतवणूकदारांच्या समुदायाला प्रोत्साहन आणि चालना देणारे काही महत्त्वाचे घटक  इथे नमूद केले आहेत.

मिलेनियल्स नवीन युगाचे तंत्रज्ञान सहजपणे अंगीकारतात:

फिनटेक क्रांतीच्या युगात मालमत्ता व्यवस्थापन, गुंतवणूका, सिक्युरिटी अॅनालिसिस आणि पोर्टफोलिओ वैविध्यीकरण या सर्व गोष्टी स्मार्टफोनमधून नियंत्रित केलेल्या अद्यायवत आणि सुलभ अॅप्सच्या मदतीने पूर्ण करता येतात. मिलेनियल्स अद्ययावत तंत्रज्ञान सहजपणे अंगीकारत असल्यामुळे त्यांनी त्यांच्या धोका मुक्त मालमत्तांच्या तुलनेत त्यांच्या गुंतवणूका कार्यरत होऊन वेगाने वाढण्यासाठी नावीन्यपूर्ण पद्धती शोधल्या आहेत.

मिलेनियल्स विश्वासार्ह माहितीचा वापर करून गुंतवणूकीचा निर्णय घेतात:

आलेल्या टिप्सवर विसंबून राहण्याऐवजी मिलेनियल्स गुंतवणूकीचा निर्णय घेण्यापूर्वी विश्वासार्हतेची माहिती घेतात. मुलभूत आणि तांत्रिक विश्लेषण देणाऱ्या सुलभ साधनांच्या उपलब्धतेसह (नवीन युगाच्या ब्रोकरेज हाऊसकडून देण्यात आलेल्या) गुंतवणूक निर्णय प्रक्रियेची एकूणच प्रक्रिया वेगवान आणि पूर्वीपेक्षा अधिक विश्वासार्ह झाली आहे.

गुंतवणूक सेवांचा दर्जा मोठ्या प्रमाणावर सुधारला आहे:

मागील दशकाच्या कालावधीत शेअर बाजारातील गुंतवणूकीची एकूणच प्रक्रिया ३६० अंशातील बदलातून गेली आहे. एआय आणि ब्लॉकचेन यांनी ट्रेडिंग वातावरणात सुधारणा करण्यासाठी अनेक संधी खुल्या केल्या आहेत. जसे वेगवान समायोजन, रिअल टाइम मॉनिटरिंग, सुधारित माहिती आणि अद्ययावत सुरक्षा उपाययोजना. याशिवाय ब्रोकर्सनी अंगीकारलेल्या ऑपरेशन्सची पारदर्शकता हे निश्चित करते की त्यांच्या ग्राहकांना सर्वोत्तम दर्जाच्या सुविधा दिल्या जातील. त्यामुळे नवीन युगाच्या गुंतवणूकदारांमध्ये जास्त विश्वास निर्माण होतो.

बाजारपेठा, कंपन्या आणि समभाग यांच्याशी संबंधित संशोधन आणि माहिती अधिक सहजसाध्य आहे: अॅनालिटिक्समुळे माहितीची आणि संशोधनाची उपलब्धता व एकूणच दर्जा अत्यंत वेगाने वाढला आहे. मिलेनियल्सना आता प्राथमिक व तांत्रिक विश्लेषण आणि त्या माहितीचा अर्थ अनियंत्रित पद्धतीने उपलब्ध होतो. त्याचबरोबर विविध प्रकारच्या थर्ड पार्टी सुविधा जसे १) स्मॉल केसः शेअर्सचे पूर्वनिश्चित बास्केट २) स्ट्रीकः सुलभीकृत तांत्रिक विश्लेषण ३) सेन्सीबुलः सुलभीकृत पर्याय ट्रेडिंग या गोष्टी आता ब्रोकरेज हाऊसेसकडून समाविष्ट केल्या गेल्या आहेत आणि ग्राहकांना त्यांचा एकूणच समभाग व्यापार अनुभव सुधारण्यासाठी दिल्या जातात.

एकूण पर्यावरणात्मक (आर्थिक) परिणाम:

कमी व्याजदर आणि दीर्घकाळात अर्थव्यवस्थेच्या कामगिरीच्या संदर्भात सकारात्मक भावना या दोन्ही गोष्टी अत्यंत सकारात्मक असलेल्या मिलेनियल गुंतवणूकदारांना चालना देत आहेत. गुंतवणूकदारांचा हा वर्ग भारतीय अर्थव्यवस्थेच्या मुलभूत बाबींवर विश्वास ठेवतो आणि शेअर बाजारातील गुंतवणूकीबाबत तुलनेने दीर्घकालीन दृष्टीकोन ठेवतो. बाजारात अनिश्चितता आणि चढउतार असले तरी मिलेनियल्स या धोक्याचे व्यवस्थापन करण्यासाठी विविध प्रकारचे तंत्रज्ञानाने युक्त धोके पत्करू शकतात.

सारांश: लाखो मिलेनियल्स विविध साधनांद्वारे भारतीय समभाग बाजारांमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. गुंतवणूकदारांचा हा वर्ग खूप सुशिक्षित आहे आणि ते समभाग गुंतवणूकीतील चढउतार समजू शकतात. ते एक गुंतवणुकीचा निर्णय घेण्यासाठी बाजाराबाबतची आपली बुद्धिमत्ता आणखी वाढवण्याबाबत आणि विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी उपलब्ध तंत्रज्ञानांचा वापर करण्याबाबत उत्सुक आहेत. देशातील स्मार्ट गुंतवणूकदारांचा हा समुदाय रिटेल गुंतवणूकदारांच्या स्थितीचे प्रतिनिधित्व करतो आणि शेअर बाजारातील गुंतवणुकीबाबत कोणतीही शंका न ठेवता नवीन युगाच्या संपूर्ण पिढीची निर्मिती करतो.

Leave a Reply

%d