Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्यांचा तपास लवकरात लवकर करावा -विरोधी पक्ष नेते अजित पवार

पुणे : पीएफआयच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्याचा प्रकार घडला आहे . त्यानंतर पीएफआयच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्र सह देशभरातून अटक झाली. केंद्र सरकारने पीएफआय संघटनेवर पाच वर्षाची बंदी घातली आहे. यावर विविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
या घटनेचा तपास लवकरात लवकर करावा अशी मागणी राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी पुण्यात पत्रकाराची बोलताना केली आहे.
महाराष्ट्रात आणि देशात कुठेही पाकिस्तान जिंदाबाद अशा घोषणा देता कामा नये, अशा आरोपींवर लवकर कारवाई झाली पाहिजे, यासंदर्भातील तपास सरकारने लवकरात लवकर संपवावा आणि कारवाई करण्यात यावी. हा तपास लांबवण्यात काही कारण नाही असं मत व्यक्त करत अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
अजित पवार पुणे दौऱ्यावर आहेत .तेव्हा त्यांनी प्रसार माध्यमांशी विविध मुद्द्यांवर संवाद साधला.
दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार आणि माजी मंत्री छगन भूजबळ यांनी ”फक्त तीन टक्के लोकांना शिकवून आम्हाला शिक्षणापासून दूर ठेवणाऱ्या सरस्वतीची पूजा कशासाठी करायची? असं वक्तव्य केलं होतं. त्यावर अजित पवार म्हणाले, छगन भुजबळ यांचं ते वैयक्तिक वक्तव्य आहे. असं पक्षाने आधीच सांगितलं आहे. प्रत्येकाला स्वत:ची भूमिका मांडण्याच अधिकार आहे. पण पक्षाने ती भूमिका घेतलेली नाही. त्यांनी त्यांची भूमिका मांडली. असं अजित पवार म्हणाले.
महाविकास आघाडी सरकारच्या काळात आपण मुंडकं खाणारा डायनासॉर होता.अशी टीका अब्दुल सत्तार यांनी अजित पवार यांच्यावर केली. त्यावर अजित पवार म्हणाले, आपण असल्या फालतू टीकांना मी महत्व देत नाही, अशा शब्दांत सत्तांराची टीकेला धुडावलं आहे.
राज्यात अस्तित्वात असलेल्या भारतीय जनता पार्टी-शिवसेना युती सरकारच्या काळातच युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासह सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी केला. त्यावर अजित पवार म्हणाले, आमच्याकडे कोणी आले नाही. २०१४ ला काय झालं ते बघा. असे अजित पवार म्हणाले.
वेदांत प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील लाखो तरुण बेरोजगार झाले आहेत. त्यावर अजित पवार म्हणाले,महागाईचा प्रश्न आहे. त्यावर चर्चा होऊ नये म्हणून कोणी तरी काही तरी बोलत असतं. त्यावर फोकस करू नका. ते बंद केलं पाहिजे. वेदांतासारखा प्रकल्प गेला. असे अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading