fbpx

… तर आधी उद्धव ठाकरेंचं भाषण बघणार -अजित पवार


पुणे:दसरा मेळाव्याच्या दिवशी शिवसेना व शिंदे गटाचा दसरा मेळावा होणार आहे. कोण कोणाचा दसरा मेळावा बघणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे . त्यावर मोठे राजकीय मेळावे घडतात, तेव्हा पोलिस यंत्रणा लागते. आता त्या दोघांमध्ये इर्षा निर्माण झाली आहे. दोघांचं भाषण एकाच वेळी सुरू झालं तर आधी उद्धव ठाकरेंचं बघणार. नंतर एकनाथ शिंदेंचं बघणार असं विरोधी पक्ष नेते अजित पवार म्हणाले आहेत. शेवटपर्यंत शिवसेनेसोबत ऋणानुबंध जपू. असंही ते म्हणाले.
चांदणी चौक पुलासंदर्भात   तज्ज्ञांनी सांगितलं पूल पाडण्याशिवाय गत्यंतर नाही. नितीन गडकरी चांदणी चौकाचि विमानाने पाहणी करणार त्यावर अजित पवार म्हणाले,जागा असेल तर हेलिकॉप्टर मध्ये माध्यम प्रतिनिधींना पण न्या. असे अजित पवार म्हणाले. पाणी तुंबल्याच्या घटनांवर बोलताना अजित पवार म्हणाले , पुण्यात प्रशासक आहे. मागे पाच वर्षे सरकार कोणाचे होते? असा सवाल अजित पवार यांनी पुण्यातील सत्ताधारी भाजपला केला.
तसेच पुण्याचा वाढीव पाण्याची गरज आहे. मुळशीच पाणी देण्याची मागणी केली होती.असंही अजित पवार म्हणाले.
लोकांची कामे झटपट झाली पाहिजे. राज्य शासनाने पालकमंत्र्यांची नेमणुक केली हि गोष्ट चांगली आहे. पण काही मंत्र्यांकडे दोनपेक्षा जास्त जिल्ह्यांची जबाबदारी आहे. पालकमंत्र्यांना जिल्ह्याच्या विकासासाठी वेळ द्यावा लागतो. उपमुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांच्याकडे ६ जिल्ह्यांची जबाबदारी आहे, मी पुण्याचा पालकमंत्री होतो, तर नाकीनऊ यायचे, त्यांना ते कसं पेलवणार हे माहिती नाही, पण माझ्या शुभेच्छा आहेत, अशा शब्दात विधानसभा अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना टोला लगावला होता. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहा जिल्ह्याचे पालकमंत्री पद सांभाळण्यासाठी माझ्याकडून ट्रेनिंग घ्या. त्यावर अजित पवार म्हणाले, मीत्यांना पत्र पाठविणार आहे. ट्रेनिंग करीता केव्हा येऊ,त्या ट्रेनिंग करीता काही फी लागणार आहे का ? की ते ट्रेनिंग मोफत दिले जाणार आहे? त्याबाबत मी त्यांच्या सोबत हितगुज करतो आणि ट्रेनिंग घेतो आणि माझ्या ज्ञानात भर घालतो. असे अजित पवार म्हणाले.
राहुल गांधी यांच्या भारत जोडत यात्रेत राष्ट्रवादी सहभागी होणार का. त्यावर अजित पवार म्हणाले,यात्रेत सहभागी होण्याच काही कारण नाही.ती काही महा विकास आघाडीची यात्रा नाही.काँग्रेस पक्षाची यात्रा आहे. आम्ही यात्रेच्या मार्गाने जात असेल तर शुभेच्छा देऊ,बेस्ट ऑफ लक म्हणून पुढे जाऊ असे त्यांनी सांगितले.
राज्यातील तब्बल ४४ आयएएस आधिकाऱ्यांच्या बदल्या आज करण्यात आल्या. शिवसेना फोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस यांच्या मर्जीतल्या वरिष्ठ आधिकाऱ्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे त्यावर अजित पवार म्हणाले, सरकार बदललं की नियुक्त्या बदलतात. 
बच्चू कडू यांनी एका शेतकऱ्याला मारहाण केली आहे त्यावर बच्चू कडू यांनी केलेली मारहाण योग्य वाटत नाही. असे अजित पवार म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: