जुन्नर तालुक्यातील दशरथ केदारी ह्या शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबास राज्य शासनाकडून एक लाखांची मदत जाहीर…
पुणे:जुन्नर तालुक्यातील आत्महत्या केलेले शेतकरी दशरथ केदारी यांच्या कुटुंबियांना तातडीने शासकीय मदत द्यावी, यासाठी आज पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे विधान परिषद उपसभापती ना. डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पाठपुरावा केला होता. या विषयासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी यांनी सविस्तर आदेश स्थानिक प्रशासनास दिले आहेत. यात तातडीने कार्यवाही करीत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याबाबत प्रशासनाला लेखी आदेश दिले आहेत.
डॉ. गोऱ्हे यांच्या कार्यालयाने या कुटुंबीयांशी संपर्क साधला होता. स्थानिक शिवसेना पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या कुटुंबीयांना स्व-निधीतून मदत दिली होती. या कुटुंबीयांनी याबाबत आभार व्यक्त केले होते. भविष्यात देखील शेतकरी आत्महत्या होऊ नयेत यासाठी काम करण्याची आवश्यकता असल्याचे मत
डॉ.गोऱ्हे यांनी व्यक्त केले आहे. .