fbpx

नाना पटोले यांना आम्ही सिरीयसली घेत नाही -चंद्रकांत पाटील

पुणे : ज्यांनी नागपूरची चड्डी घातली तो थेट जॉईंट सेक्रेटरी होतो, असे वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आहे. बुलडाणा इथं आयोजित करण्यात आलेल्या भीमशक्ती मेळाव्यातनाना पटोले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका केली. सध्या देशाची व्यवस्था संपवण्याचं काम सुरु आहे. लोकशाहीच्या चारही स्तंभाना संपवण्याचं काम सुरु असल्याचेही नाना पटोले यावेळी म्हणाले. त्यावर खूप दिवसांनी पटोले बोलले. ज्याचा हातात राज्य त्याला ते चालवता येण्यासाठी कंपोस्ट पाहिजे . नाना पटोले यांना आम्ही सिरीयसली घेत नाही. अशी प्रतिक्रिया भाजपचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईक यांच्यातील वाद नवा नाही. आता ओवळा माजीवाडा मतदारसंघावरून दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले आहे. त्यावर  माहिती घेऊन बोलतो. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
चांदणी चौकात सतत वाहतुकीचा प्रश्न नागरिकांना जाणवत आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,चांदणी चौक ६ lane पूर्ण झाल्यावर प्रश्न सुटतील. एक लेन जड वाहनांसाठी सोडण्याचा प्रस्ताव आहे. ते सुरळीत ठेवू असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
राज्यातील तब्बल ४४ आयएएस आधिकाऱ्यांच्या बदल्या आज करण्यात आल्या. शिवसेना फोडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस यांच्या मर्जीतल्या वरिष्ठ आधिकाऱ्यांना आपल्याकडे वळविण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री शिंदे यांनी केला आहे त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, दोन-तीन वर्ष त्यांच्या हातात सरकार असताना त्यांनी सुद्धा आधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. शेवटी कारभार चालवताना आवश्यक मन पॉवर असते. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: