fbpx

वर्ल्डलाईन इंडियाच्या पेटेक पायोनीयर प्रोग्राम अंतर्गत अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची भरती योजना

पुणे  : डिजिटल पेमेंट सेवा क्षेत्रातील अग्रणीय कंपनी वर्ल्डलाईन इंडियातर्फे आज पेटेक पायोनीयर प्रोग्राम या कार्यक्रमाची घोषणा करण्यात आली आहे .या उपक्रमांतर्गत देशभरातील महाविद्यालयांच्या कॅम्पसमधून भारताच्या सर्वोत्कृष्ट अभियंत्यांची भरती करण्यात येणार आहे.

सप्टेंबरपासून प्री-प्लेसमेंट चर्चा करण्यासाठी वर्ल्डलाईन इंडिया पुण्यातील नामवंत अभियांत्रीकी महाविद्यालयांना भेटी देणार आहेत . नुकतेच पदवीधर झालेल्यांची निवड तीन फेरीनंतर करण्यात येणार असून ऑनलाईन चाचणी, क्षमता चाचणी व तार्किक मूल्यमापन, तांत्रिक व्यवस्थापकीय क्षमता आणि कौशल्ये यांचा त्यात समावेश आहे. दहावी व बारावीपर्यंत ७० टक्के किंवा जास्त आणि अंतिम सेमिस्टरपर्यंत ६ किंवा त्याहून जास्त सीजीपीए असलेल्या बीई/बी टेक सीएस /आयटी उमेदवारांचा पात्रता फेरीसाठी विचार करण्यात येईल.

पेटेक पायोनीयरना जानेवारी २०२३ पासून इंटर्न म्हणून आणि वर्ल्डलाईनचे कर्मचारी म्हणून जुलै २०२३ पासून भरती करण्याची वर्ल्डलाईनची योजना आहे. या कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी आणि प्री-प्लेसमेंट चर्चांसाठी https://in.worldline.com/paytech-pioneer/ या संकेतस्थळाला भेट द्या.

मुंबई, पुणे, बंगळुरू आणि चेन्नई येथील कार्यालयांमध्ये २०२३ च्या बॅचच्या २०० प्रशिक्षणार्थी अभियंत्यांची भरती करण्यात येणार असून तीन वर्षांमध्ये ही संख्या ३००० पर्यंत नेण्याची वर्ल्डलाईन इंडियाची योजना आहे. नवीन रूजू होणारे कर्मचारी नुकतेच पदवीधर होण्यापासून संपूर्ण डेव्हलपर होण्यापर्यंतचा प्रवास ३ वर्षांच्या अवधीत पूर्ण करतील. या कालावधीत ते जावा, डॉट नेट, सी प्लस प्लस ,टेस्टिंग, पीएचपी, पायथॉन, एम वायएसक्यूएल, पोस्टग्रेस इत्यादी कौशल्यांचे प्रत्यक्ष कामादरम्यान प्रशिक्षण प्राप्त करतील. याशिवाय संपूर्ण सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल पूर्ण करणे,कोड क्वालिटी कायम ठेवणे, विश्वसनीयता आणि निरूपयोगिता, समस्या निवारण, डिबगिंग आणि वर्तमान सिस्टिम सुधारणे याचे देखील प्रशिक्षण देण्यात येईल.

वर्ल्डलाईन इंडिया आणि एपीएसीचे वरिष्ठ उपाध्यक्ष आणि एचआर विभागाचे प्रमुख जोस राज म्हणाले की पेटेक पायोनीयर प्रोग्रामची सुरूवात करताना आम्हाला आनंद होत असून वर्ल्डलाईनला जागतिक प्रीमियम पेटेक कंपनी होण्याच्या आमच्या दृष्टिकोनाशी तो सुसंगत आहे. देशात सध्या तंत्रज्ञान व्यावसायिक होण्याचा उत्तम काळ आहे कारण भारत हा अजूनही तंत्रज्ञानातील प्रतिभावंतांचे आगार आहे. वर्ल्डलाईनचा फायदा हा आहे की पेटेकमधील नाविन्यतेमध्ये आम्ही आघाडीवर आहोत.

Leave a Reply

%d bloggers like this: