fbpx

दूरस्थ शिक्षण च्या प्रवेशाला सुरुवात

एम.ए व एम. कॉम चे प्रवेश सुरू: ३० ऑक्टोबर पर्यंत करा अर्ज

पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुक्त व दूरस्थ (ओपन अँड डिस्टंन्स) अध्ययन प्रशालेअंतर्गत एम.ए व एम. कॉम २०२२ च्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांना ३० ऑक्टोबर पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरता येणार आहे.

मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, इतिहास, समाजशास्त्र, तत्वज्ञान व शिक्षणशास्त्र या विषयात एम.ए व एम.कॉम या दूरस्थ अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षासाठीची प्रवेश प्रक्रिया प्रशालेच्या http://unipune.ac.in/SOL/ या संकेस्थळावर शुक्रवार दिनांक ३० सप्टेंबरपासून ऑनलाईन पद्धतीने सुरू होत आहे. ऑनलाईन नावनोंदणीसाठी ३० ऑक्टोबर सायंकाळी ५ वाजेपर्यंत अर्ज करता येईल. ऑनलाईन शुल्क भरून अर्ज भरण्याची अंतिम तारीख ३१ ऑक्टोबर सायंकाळी ५ पर्यंत आहे. तर अभ्यास केंद्रांवर प्रवेश अर्ज जमा करण्याची अंतिम तारीख १५ नोव्हेंबर सायंकाळी ५ पर्यंत असणार आहे. मुक्त व दूरस्थ अध्ययन प्रशलेतर्फे याबाबतचे परिपत्रक काढण्यात आले आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: