fbpx

हो, २०१४मध्ये शिवसेने बरोबर सरकार बनवण्याबाबत चर्चा झाली होती – माणिकराव ठाकरे

पुणे : राज्यात 2014 मध्ये सत्तेवर आलेल्या भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सरकारच्या काळातच युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादी पक्षासोबत सरकार स्थापन करण्याचा प्रस्ताव शिवसेनेकडून आला होता, असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. यावर वीविध नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, “त्या त्या वेळेस चा विषय असतो.२०१४ ला शिवसेनेशी चर्चा झाली होती. अशोक चव्हाण खोट बोलत नाहीत.”

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या प्रशिक्षण व प्रबोधन समितीच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या प्रशिक्षणाच्या पूर्वतयारीची बैठक आज काँग्रेसचे माझी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. तेव्हा माणिकराव ठाकरे यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला.

माणिकराव ठाकरे म्हणाले, जर २०१४ साली राष्ट्रवादीने त्यावेळी आधीच बाहेरुन पाठींबा जाहीर केला नसता. तर चित्र वेगळे पाहायला मिळाले असते. राष्ट्रवादीने वेगळी भूमिका घेतल्याने तो विषय पुढे जाऊ शकला नाही. शिवसेनेचे नेते आमच्याकडे त्यावेळी प्रस्ताव घेऊन आले होते. पण राष्ट्रवादी शिवाय सरकार बनवणे शक्य नव्हते. त्यामुळं सगळं तिथंच थांबल. भाजपला बाजूला काढण्यासाठी हा सर्व विषय चालू होता, असे माणिकराव ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना ते म्हणाले, मी त्यावेळी प्रदेशाध्यक्ष असल्याने मला या प्रस्तावाची पूर्ण कल्पना होती. आताच्या मुख्यमंत्र्यांना भाजपच्या जाळ्यात आता ओढण्यात आलं आहे,’ असं विधान माणिकराव ठाकरे यांनी केलं आहे.

सध्या देशभर राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रे’मध्ये तुम्हाला कोणती जबाबदारी दिली आहे का. त्यावर माणिकराव ठाकरे म्हणाले, राहुल गांधी यांच्या भारत जोडोमध्ये माझ्याकडे एका समितीची जबाबदारी दिली आहे. जनमानसापर्यत ती यात्रा पोहचवण्याची जबाबदारी दिली आहे. त्याचे कार्यक्रम आखले आहेत. काँग्रेसचा इतिहास लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी आम्ही राज्य स्तरावर काम करत आहोत,असे माणिकराव ठाकरे म्हणाले.

संत गाडगेबाबा यांच्या नावाने दहा सूत्री कार्यक्रम केला होता आता या सरकारने तो थांबवला आहे. त्यावर माणिकराव ठाकरे म्हणाले, त्याचा निषेध झाला पाहिजे, असेही माणिकराव ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: