fbpx

गरीब बेघरांच्या पाठिशी राष्ट्रवादी कायमच उभी राहील 

पुणे : मार्केटयार्ड येथील आनंदनगर झोपडपट्टीतील मागासवर्गीय व अल्पसंख्याकांची घरे दहशत व गुंडगिरीच्या जोरावर पाडण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला. या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी व झोपडपट्टी वासियांना अधिकृतरित्या आहे त्या जागेवर पक्की घरे बांधून द्यावी या मागणीसाठी आज एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले.

आनंद नगर झोपडपट्टीतील रहिवाशांच्या न्याय हक्कासाठी गंगाधाम चौक येथे संजय दामोदरे यांच्या पुढाकाराने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. मार्केटयार्ड येथील आनंदनगर झोपडपट्टीतील मागासवर्गीय व अल्पसंख्याकांची घरे दहशत व गुंडगिरीच्या जोरावर पाडण्याचा प्रकार काही दिवसांपूर्वी घडला होता. त्यामध्ये भाजपच्या आमदार,स्थानिक नगरसेवक व आमदारांचा भाऊ व हे सर्व सहभागी होते. तेथील बिल्डरच्या फायद्यासाठी हा सर्व उद्योग करण्यात येत होता. आश्चर्याची बाब आहे की एवढा सगळा प्रकार घडल्यानंतरही अद्यापही त्यांच्यावर कोणतीच कायदेशीर कारवाई करण्यात आली नाही. सोशल माध्यमांवर सर्वत्र त्याचे व्हिडिओ सुद्धा उपलब्ध आहेत. संबंधित बिल्डर सह आमदार, नगरसेवक यांच्यावर कारवाई करावी व झोपडपट्टी वासियांना अधिकृतरित्या आहे त्या जागेवर पक्की घरे बांधून द्यावी या मागणीसाठी आज एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना प्रवक्ते प्रदीप देशमुख म्हणाले, सत्तेचा दुरुपयोग करून भाजपच्या मंडळीकडून गरिबांना बेघर करण्यात येत आहे. बिल्डरांच्या फायद्याकरिता वर्षानुवर्षे राहात असलेल्या गरिबांची घरे तोडण्यात आली लहान मुले वृद्ध यांचासुध्दा विचार हे दुष्कूत्य करीत असताना त्यांना आला नाही.  घरे तोडण्याचे त्यांचे काम चालूच होते व लोकांमध्ये अशाप्रकारे दहशत माजवून गरीबांवर अन्याय
व अत्याचार करीत राहीले कोणत्याही शासकीय यंत्रणेला ही भाजपची मंडळींन दाद देत नाहीत ह्या बिल्डर धार्जिण्या भाजपाच्या मंडळींबाबात प्रशासनाने योग्य ती कारवाई त्वरीत करायला हवी, अशी मागणी देशमुख यांनी केली.

याप्रसंगी राष्ट्रवादी प्रवक्ते प्रदीप देशमुख, नितीन कदम, संजय दामोदरे, दिनेश खराडे, श्वेता होणराव, मृणालिनी वाणी, सचिन पासलकर, अर्जुन गांजे, विश्वास दिधे तसेच अनेक स्थानिक नागरीक ही मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Leave a Reply

%d bloggers like this: