केंद्र सरकारने PFI संघटनेवर बंदी घातली म्हणून मनसेचा जल्लोष
पुणे : देशभरात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया संघटनेच्या कार्यकर्त्यांना देशविघातक कृत्य केल्याच्या संशयावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) अटक केल्यानंतर व पुण्यात झालेल्या घोषणाबाजीवरून संशय निर्माण झाल्यानंतर आता
दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा ठपका असलेली पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर केंद्र सरकारने पाच वर्षांची बंदी घातली आहे
.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्या पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया या संघटनेवर बंदी घालावी म्हणून आंदोलन केले होते.केंद्र सरकारने पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर पाच वर्षांची बंदी घातली म्हणून मनसेने आज अलका टॉकीज चौकात फटाके वाजवून व लाडू वाटून जल्लोष साजरा केला. मनसेचे पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर, अजय शिंदे, सारंग सराफ, बापू वासगावकर, मनसेच्या महिला पदाधिकारी कार्यकर्त्या व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
साईनाथ बाबर म्हणाले,पाकिस्तान जिंदाबाद म्हणणाऱ्या पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर मनसेच्या आंदोलनमुळे त्वरीत बंदी घातली . केंद्र सरकारला हे सुचलेले शहा पण आहे. भारतात पीएफआय’ सारख्या संघटना आहेत. त्यांच्यावर पीएफआय संघटनेवरबंदी घातली . बाकीच्या संस्थेवरील बंदी घालावी. आज आम्ही
पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेवर बंदी घातली म्हणून जल्लोष साजरा करत आहोत. असे साईनाथ बाबर म्हणाले.
