fbpx

श्री महालक्ष्मी देवीकडून मिळणारी दिव्य शक्ती जनकल्याणार्थ वापरु – लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला

पुणे : नवरात्रीच्या पर्वामध्ये मातेच्या सर्व पूजा केल्या जातात. मातेकडून शक्ती अर्जित करण्याचे हे पर्व आहे. त्यामुळे मातेकडून सर्वांनाच दिव्य शक्ती मिळू देत आणि ती शक्ती आपण जनकल्याणार्थ वापरुया, अशी प्रार्थना लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी श्री महालक्ष्मी देवी चरणी केली.

श्री महालक्ष्मी मंदिर, श्री बन्सीलाल रामनाथ अग्रवाल धार्मिक व सांस्कृतिक ट्रस्ट च्यावतीने आयोजित नवरात्र उत्सवात ओम बिर्ला यांचे स्वागत व सन्मान श्री महालक्ष्मी देवीची प्रतिमा, सन्मानचिन्ह व महावस्त्र देऊन करण्यात आला. यावेळी मंदिराचे प्रमुख संस्थापक विश्वस्त राजकुमार अग्रवाल, प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल, विश्वस्त अ‍ॅड.प्रताप परदेशी, हेमंत अर्नाळकर, भरत अग्रवाल, तृप्ती अग्रवाल, प्रविण चोरबेले, रमेश पाटोदिया, निलेश लद्दड आदी उपस्थित होते.

बुधवारी सायंकाळी ओम बिर्ला यांनी श्री महालक्ष्मी देवीचे दर्शन घेत आरती केली. यावेळी मंदिरातील श्री महासरस्वती आणि श्री महाकाली देवीचे दर्शन घेण्यासोबतच ट्रस्टतर्फे राबविण्यात येणा-या सामाजिक उपक्रमांची माहितीही जाणून घेत शुभेच्छा दिल्या.

प्रमुख विश्वस्त अमिता अग्रवाल म्हणाल्या, कोविडनंतर दोन वर्षांनी मोठया उत्साहात यंदाचा नवरात्रोत्सव साजरा होत आहे. त्यामुळे केवळ पुणे आणि महाराष्ट्रातीलच नव्हे तर भारतभरातून विविध क्षेत्रातील मान्यवर देवीच्या दर्शनाकरिता येत आहेत. त्यामुळे त्यांचे स्वागत ट्रस्टतर्फे उत्साहात केले जात आहे. त्यांनी दिलेल्या भेटी दरम्यान सामाजिक उपक्रमांविषयी चर्चा करुन मोठया स्वरुपात समाजासाठी काय करता येईल, याचे मार्गदर्शन देखील या मान्यवरांकडून मिळत असल्याचा आनंद त्यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

%d bloggers like this: