fbpx

डॉ. मरे टॉड यांची भारतातील वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल, पुणेच्या फाउंडिंग मास्टरपदी नियुक्ती

पुणे – युकेमधील अनुभवी शिक्षणतज्ज्ञ, युके व आशियातील के-१२ शिक्षणासाठी लक्षणीय योगदान देणारे डॉ. मरे टॉड यांची वेलिंग्टन कॉलेज, भारताच्या फाउंडिंग मास्टरपदी नियुक्ती झाली आहे. हे कॉलेज भारतातील नामवंत के-१२ संस्था असून त्यात पूर्व व पश्चिमेच्या सर्वोत्तम शिक्षण पद्धतींचा मेळ घालण्यात आला आहे.

या नव्या भूमिकेत डॉ. टॉड वेलिग्टंन कॉलेज आणि देशातील नामवंत संस्था युनिसन समूहाच्या सहकार्याने भारतीय शिक्षणावर ठळक ठसा उमटवण्याचे आपले स्वप्न जाहीर करतील. डॉ. टॉड यांना शिक्षण क्षेत्राचा तीन दशकांचा अनुभव असून सुरुवातीला एडिनबर्ग आणि ग्लासग्लो विद्यापीठांसह केलेले काम आणि त्यानंतर युके स्कूल्स (ग्लेनमंड कॉलेज, रनोच स्कूल आणि एप्सम कॉलेज) आणि नव्या आंतरराष्ट्रीय संस्था (मलेशियातील एप्सम कॉलेज आणि मर्चिस्तान इंटरनॅशनल स्कूल, शेन्झेन, चीन) या प्रतिष्ठित एडिनबर्ग संस्थेची सिस्टर स्कूलमध्ये त्यांनी महत्त्वाची बोर्डिंग पदे निभावली आहेत.

नव्या भूमिकेविषयी डॉ. टॉडम्हणाले, भारतात शिक्षणतज्ज्ञ म्हणून काम करण्यासाठी आत्ताचा काळ विलक्षण आहे. देशातील शिक्षणाचा अनुभव उंचावण्यासाठी कित्येक वेगवेगळे पर्याय शोधता येतील. माझ्या परीने, मी या अनोख्या सहकार्याच्या मदतीने भारतातील समृद्ध शिक्षण क्षेत्रासाठी महत्त्वाचे योगदान देण्याचा प्रयत्न करेन. युनिसन समूह आणि वेलिंग्टन कॉलेज यांच्यातील सहकार्य भारतीय शिक्षण क्षेत्रासाठी निर्णायक ठरेल. युनिसन समूहाचा दृष्टीकोन आंतरराष्ट्रीय पातळीवर आघाडीचा आणि प्रेरणादायी असून सर्वसमावेशकता आणि स्थानिक/राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय समुदायाशी संवाद साधत आपली उद्दिष्टे साधण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. वेलिंग्टन कॉलेज इंटरनॅशनल, पुणेद्वारे दर्जेदार शिक्षण पुरवले जाईल, युकेतील शिक्षणाचा भाग असलेली सर्वोत्तम मूल्ये आणि परंपरांची ओळख करून दिली जाईल व ते करताना भारताचा समृद्ध इतिहास व वैविध्यता यांवर भर दिला जाईल. संस्थेद्वारे नाविन्यपूर्ण आणि निर्णायक शैक्षणिक प्रवासाची ग्वाही देण्यात आली आहे.

आगामी सहकार्याविषयी वेलिंग्टन कॉलेज, इंडियाचे सह- संस्थापक अनुज अगरवाल म्हणाले, वेलिंग्टन कॉलेज, युकेशी झालेल्या सहकार्याच्या माध्यमातून आम्ही भारतात के-१२ विभागात शैक्षणिक नियमावलीत क्रांती घडवून आणण्यासाठी असलेली बांधिलकी नव्याने अधोरेखित करत आहत. वेलिंग्टन कॉलेजची मूल्ये, नैतिकताकायमस्वरूपी गुणवत्ता इतरांपर्यंत पोहोचवण्याचे आमचे ध्येय असून त्यासाठी ब्रिटिश व भारतीय शिक्षणातील बलस्थानांचा मेळ घातला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आत्मविश्वासपूर्ण, उद्यमशील बनवण्यावर आणि आयुष्यातील आव्हानांना तोंड देण्यासाठी सक्षम करण्यावर तसेच ते काम करण्यासाठी ज्या कंपनीची निवड करतील तिथे आपले अढळ स्थान कसे तयार करायचे हे शिकवण्यावर आम्ही भर देणार आहोत.

Leave a Reply

%d bloggers like this: