तानाजी सावंत यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी… – संभाजी ब्रिगेड
पुणे : मंत्री तानाजी सावंत साख्या संरजाम, प्रस्थापित मराठ्यामुळेच मराठा ओबीसी करण रेंगाळलेल आहे. मराठा समाजाचा सरसकट ओबीसी पध्ये समावेश झाला पाहीजे ही संभाजी ब्रिगेड ची गेल्या ३० वर्षा पासूनची मागणी आहे. सरकारमधील प्रस्थापित मराठा नेत्यांची इच्छा नाही की, मराठा समाजाला आरक्षण मिळाला पाहिजे. म्हणून तानाजी सावंत सारखी माणसं मराठा मोर्चाला मराठ्यांना आत्ताच का खुजली सुटली’ असं बेताल वक्तव्य करतात. अशा
बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्री सावंतला मराठा समाज धडा शिकवेल. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी मराठा समाजाची बदनामी केल्याप्रकरणी तानाजी सावंत यांचा राजीनामा घ्यावा आणि त्यांची मंत्री पदावरून हकालपट्टी करावी… अशी मागणी संभाजी ब्रिगेड चे प्रदेश संघटक संतोष शिंदे यांनी केली आहे.
