Wednesday, June 17, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

तानाजी सावंताच्या वादग्रस्त वक्तव्यावर चंद्रकांत पाटलांची सारवासारव

पुणे :काल एका जाहीर सभेत आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत म्हणाले, कि या सरकारच्या काळात मराठा आरक्षण मिळणारच, पण मराठा आरक्षणाचा विषय आत्ताच काढून वातावरण खराब करणाऱ्यांना आपण ओळखले पाहिजे. इतके दिवस ते गप्प का होते? त्यांना आत्ताच मराठा आरक्षणाच्या विषयाची खाज का निर्माण झाली? असे म्हणत त्यांनी राष्ट्रवादीवर दुटप्पी भूमिका घेतल्याचा आरोप करत टोला लगावला आहे. त्यावर तानाजी सावंत यांनी एखाद्या वाक्य म्हटलं की त्याची तोडमोड करून ते समोर आणलं जातं त्यातला ग्रामीण आणि शहरी भावना व्यक्त करण्याचा आमच्या रावसाहेब दानवे यांच्या बाबतीत नेहमी हेच होतं. पण ग्रामीण भागातल्या लोकांना विचारलं की ते म्हणतात यात काय आहे तानाजी सावंतांना एवढेच म्हणायचं होतं की मराठा समाजाला आरक्षण जवळजवळ स्वातंत्र्यापासून दिलं म्हणजे बीजेपी सरकारने दिलं. असे भाजपचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे पुण्यात पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

आज नवरात्र उत्सवाला प्रारंभ होत आहे. चंद्रकांत पाटील यांनी सारसबाग येथील महालक्ष्मी मंदिरात* जाऊन देवीचे दर्शन घेतले त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांची संवाद साधला.
चंद्रकांत पाटील म्हणाले,हायकोर्टात टिकवलं ते सुप्रीम कोर्टात एक वर्ष टिकवलं .मग अडीच वर्षात आंदोलन का केली नाही .असं तानाजी सावंत यांना म्हणण्याचा अर्थ आहे .माझी हात जोडून विनंती आहे की ज्यावेळी एखादी मागणी तेव्हा उठ सूट गैरसमज करून घेण्याचा काही गरज नाही. त्यांचं पुढचं वाक्य हे होतं की आता आपलं सरकार आलंय आपण करूया. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या समर्थकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करणार, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.मात्र, रात्री उशीरापर्यंत पुणे पोलिसांकडून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. याबाबत सध्या मोठी साशंकता निर्माण झाली आहे. असे विचारले असता ते म्हणाले की, हा विषय खुप संवेदनशील आहे. गुप्तता राखण्याचा विषय आहे. त्यामुळे पोलीस विभागावर कोणीही दबाव आणू नये, त्यांना त्यांच काम करु द्या. देशाच्या दृष्टीने संवेदनशील विषयावर माझ्यासारख्या मंत्र्यांनेही अपूऱ्या माहितीच्या आधारे बोलू नये, असं मला वाटतं. या विषयासाठी राज्याचे गृहमंत्री आहेत. असे चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading