fbpx

पु.ल. देशपांडे यांचे लिखाण कालातीत आहे – प्रवीण तरडे

पुणे  : “लिखाणाचा असा कोणताही प्रकार नाही,ज्यात पुलंनी लेखन केले नाही. त्यांचे लिखाण हे उच्च दर्जाचे होते. त्यांच्या लेखनातील बबडू , नारायण, नाथा कामत ही सगळी पात्रं आजही आपल्या अवती भवती दिसतील. त्यांचे लिखाण हे कालातीत आहे,” असे मत अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी व्यक्त केले.

पुलंच्या ‘व्यक्ती आणि वल्ली’ या लेखनावर सादर झालेल्या नाटकात मी ‘बबडू ‘ हे पात्र साकारले होते, अशी आठवण देखील त्यांनी सांगितली.

व्हिनस ट्रेडर्स’च्या ‘रायटिंग वंडर्स’ या फर्ग्युसन रस्ता येथील खास पेनासाठी समर्पित असलेल्या स्वतंत्र दालनात पु.ल. देशपांडे यांच्यावरील ‘सिग्नेचर जर्नल’ , ‘ पु.ल. देशपांडे यांच्या सिग्नेचर पेन आणि जर्नलचा गिफ्ट सेट’ आणि लहान मुलांसाठी खास ‘चिंटू’ फाऊंटन पेन उपलब्ध करण्यात आला आहे. व्हिनस ट्रेडर्स’तर्फे आयोजित कार्यक्रमात अभिनेता प्रवीण तरडे आणि चिंटूकार चारुहास पंडित यांच्या हस्ते या विशेष सुविधेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी व्हिनस ट्रेडर्स’चे सुरेंद्र करमचंदानी आणि प्रमोद करमचंदानी उपस्थित होते. यावेळी तरडे यांनी पु.ल.देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा दिला.

तरडे म्हणाले, ” पुलं यांचे लेखन वाचण्या पूर्वीपासूनच माझ्यावर त्यांचा प्रभाव होता. लहानपणी एका पुस्तकावर त्यांची सही मी पाहिली होती.  ती मला इतकी आवडली होती, की आपली सहीदेखील त्याप्रमाणे वळणदार असावी असे मला वाटू लागले आणि त्यासाठी मी हस्ताक्षर लेखनाचा सराव केला आणि नंतर त्यात यशस्वी देखील झालो. त्यामुळे माझ्या लेखनावर त्यांचा मोठा प्रभाव आहे असे मी मानतो.”

ज्यावेळी पु.ल. देशपांडे एखाद्या इंग्रजी नाटक मराठीत लिहायचे, त्यावेळी त्यांच्या लेखनात इतका आपलेपणा असायचा, इथल्या मातीशी ते इतके जोडले गेले असायचे की ते नाटक आधी मराठीत लिहले आणि नंतर इंग्रजीत लिहले गेले आहे असे वाटायचे. त्यांच्या लेखनाने आपल्याला केवळ हसवले नाही,तर आपले जीवन समृद्ध केले आहे,असेही तरडे यांनी यावेळी सांगितले. ‘चिंटू’ हा आपला लहानपणीचा हिरो आहे,असेही त्यांनी यावेळी सांगितले.

चारुहास पंडित म्हणाले, ” फाऊंटन पेनद्वारे लिखाण केल्याने तुमच्या हस्ताक्षराला सुंदर वळण मिळते आणि त्यामुळे तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास होतो.”  पु.ल. देशपांडे यांच्या सिग्नेचर पेन आणि जर्नल गिफ्ट सेट तसेच ‘चिंटू’ फाऊंटन पेन याबाबत माहिती देताना सुरेंद्र करमचंदानी म्हणाले,” पु.ल. देशपांडे यांचा ‘सिग्नेचर पेन’ आपण यापूर्वीच प्रदर्शित केला आहे. यंदा आपण थोडक्यात त्यांच्या चारित्राचा आणि त्यांच्या गाजलेल्या वाक्यांचा अर्थात ‘कोट्स’ चा समावेश असलेली जर्नल उपलब्ध करून देत आहोत. तसेच लहान मुलांमध्ये लिखाणाची आवड निर्माण व्हावी. त्यांचे हस्ताक्षर सुधारावे, यासाठी आम्ही चिंटू हा फाऊंटन पेन तयार केला आहे. आमच्या ‘रायटिंग वंडर्स’च्या दालनात रसिकांना या दोन्ही सुविधा उपलब्ध असणार आहेत. उच्च दर्जाच्या पु.ल. देशपांडे यांच्या सिग्नेचर जर्नल’ची किंमत ४९९ रुपये इतकी आहे. तर पु.ल. देशपांडे यांच्या सिग्नेचर पेन आणि जर्नल गिफ्ट सेटची किंमत १८९९ रुपये आहे. चिंटू पेन’ची किंमत १९९ रुपये आहे.

Leave a Reply

%d bloggers like this: