आदित्य ठाकरे यात्रा काढून पायावर धोंडा मारून घेतायत – चंद्रकांत पाटील
पुणे: वेदांता फॉक्सकॉन कंपनी महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात आज पुणे जिल्ह्यातील तळेगावात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. त्यावर आदित्य ठाकरे यात्रा काढून पायावर धोंडा मारून घेतायत .त्यांना माहिती नाही कि आपल्यामुळे किती प्रकल्प बाहेर गेलेत. अशी टीका भाजपचे नेते व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पत्रकारांची बोलताना आदित्य ठाकरे यांच्यावर केली.
वेदांता-फॉक्सकॉन सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्या प्रकरणी आरोपांची राळ उठविणाऱ्या महाविकास आघाडीला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी खडेबोल सुनावले.मविआ सरकारच्या काळात रखडलेल्या प्रकल्पांची यादीत त्यांनी भर पत्रकार परिषदेत वाचून दाखविली. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले,
पुण्याची महानगरपालिका निवडणूक कोण जिंकणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, आम्ही जरी सत्तेत नसतो तरी पुण्यात आम्ही निवडणूक जिंकली असती असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीर जमा जमा करून आंदोलन केले. NIA, ED या केंद्रीय तपास यंत्रणेने पीएसआय च्या राज्यस्तरीय नेत्यांना अटक केल्याच्या निषेधार्थ काल पॉपुलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’ची घोषणाबाजी केली. हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावर हा खूप संवेदनशील विषय आहे .पोलीस यंत्रणा चांगला तपास करतीये .पीएफआय या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अटक झालीये . असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील पालकमंत्र्यांची नावे जाहीर केली आहेत. त्यावर पाटील म्हणाले, आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला पुण्याचे पालकमंत्री होण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे हार्दिक आभार मानत आहे. आज पालकमंत्री पदाचं वाटप झालेलं आहे .पुण्याच्या विविध प्रश्नांवर काम करायचं आहे पालकमंत्री पदाची जबाबदारी द्यायला उशीर झाला असं वाटत नाही . ही एक प्रक्रिया आहे असेही पाटील म्हणाले.