fbpx

यळकोट यळकोट… जय मल्हार, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन खंडेरायाच्या दर्शनाला

जेजुरी : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी वाजता जेजुरी गडावर जाऊन खंडेरायाचे दर्शन घेतले.

अर्थमंत्री सीतारामन काल पासून बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असून आज सकाळी साडे नऊ वाजता त्यांचे जेजुरी गडावर आगमन झाले. त्यांच्या सोबत माजी मंत्री विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील, दौडचे आमदार राहुल कुल, कांचन कुल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, राहुल शेवाळे, संगीताराजे जाधवराव निंबाळकर, सचिन पेशवे, आमदार माधुरी मिसाळ, आमदार बाळा भेगडे त्याचबरोबर स्थानिक भाजपचे कार्यकर्तेही उपस्थित होते.

खंडोबाचे दर्शन घेऊन त्यांनी कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी पार पाडले. गडकोटातील बालदारीत झालेल्या छोटेखानी समारंभात त्यांचे मार्तंड देवसंस्थान, पुजारी वर्गाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले.

Leave a Reply

%d bloggers like this: