Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

‘मंडई’ च्या शारदा गजाननाचे भव्य पुष्परथातून आगमन

 

पुणे : गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने दुमदुमलेला मंडई परिसर, ढोल-ताशांच्या निनादाने भारावलेले वातावरण आणि फुलांनी सजविलेल्या भव्य पुष्परथातून झालेले शारदा गजाननाचे आगमन… अशा भक्तिमय वातावरणात पुण्याचे वैभव असलेल्या अखिल मंडई मंडळाच्या शारदा गजाननाचे उत्सव मंडपात आगमन झाले. मंडळाच्या गणेशोत्सवाचे यंदा १३३ वे वर्ष असून, आगमनानंतर दुपारी १२ वाजता डॉ. विनय थोरात आणि प्रतिभा थोरात यांच्या हस्ते हरिहर मंदिरात श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली.

यावेळी डॉ. पराग काळकर, डॉ. सतीश देसाई, अखिल मंडई मंडळाचे अध्यक्ष अण्णा थोरात, ॲड. प्रताप परदेशी, जयंत किराड, संजय मते, अभय थोरात, मिलिंद काची, सचिव विश्वास भोर, सुरज थोरात यावेळी उपस्थित होते.

अखिल मंडई मंडळ ते मंडई पोलीस चौकी, रामेश्वर चौक, गोटीराम भैया चौक, मेट्रो स्टेशन मार्गे उत्सव मंडप असा आगमन मिरवणुकीचा मार्ग होता. मिरवणुकीत समर्थ आणि तालचक्र ढोलपथकांसह न्यू गंधर्व बँड सहभागी झाले होते. मिरवणुकीच्या अग्रभागी न्यू गंधर्व बँड पथक आणि वाद्यपथके होती.

भव्य हरिहर मंदिरात विराजमान झाले शारदा गजानन — तब्बल ९० बाय ६० फूट आकाराच्या मंडपात २५ फूट उंचीचे हे मंदिर साकारण्यात आले आहे. हरिहर मंदिराची संकल्पना भगवान शिव आणि भगवान विष्णू यांच्या एकात्मतेचा संदेश देणारी आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading