fbpx

उपमुख्यमंत्री झालो तेव्हाच गृहमंत्री करा म्हंटले होते; अजित पवार यांनी मनातली खदखद बोलून दाखवली

पुणे : जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हाच गृहमंत्री करा असं म्हंटल होत, अशी खदखद विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आज कार्यकर्त्यांन समोर बोलून दाखवली. तसेच प्रसंगावधान दाखवत ‘वरिष्ठांनाही वाटतं याला गृहमंत्रीपद दिलं तर हा आपलंही ऐकणार नाही’, असे म्हणत अजित पवारांनी सभागृहात हशा पिकवला.

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुणे शहरातील हडपसर विधानसभा मतदारसंघ , वडगांवशेरी विधानसभा मतदारसंघ , पर्वती विधानसभा मतदारसंघ, पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदारसंघातील पदाधिकऱ्यांची आढावा बैठक आज नेहरू मेमोरियल हॉल येथे संपन्न झाली. तेव्हाअजित पवार बोलत होते. आढावा बैठकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रदीप देशमुख,खासदार .वंदना चव्हाण, आमदार सुनील टिंगरे,.चेतन तुपे,माजी आमदार कमलनानी ढोले पाटील,जगन्नाथबापू शेवाळे, जयदेवराव गायकवाड, अंकुशआण्णा काकडे, रवींद्रआण्णा माळवदकर आदी उपस्थित होते.

बैठकीत अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असतानाच स्टेजवरील एका कार्यकर्त्याने तुम्हीच गृहमंत्री व्हा, असे म्हंटले. यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, जेव्हा जेव्हा सरकारमध्येही उपमुख्यमंत्री केले, तेव्हा मी वरिष्ठांना म्हंटले की माझ्याकडे गृहखाते द्या. पण, वरिष्ठांना वाटते की याला गृहखाते दिले की हा आपले पण ऐकायचे नाही, असे म्हणताच सभागृहात हशा पिकला होता. पुढे ते म्हणाले, मला जे योग्य वाटेल ते स्वीकारलं. यात राष्ट्रवादीचा जरी चुकला दादा पोटात घ्या पोटात घ्या पोटात नाही आणि मोटात नाही. सर्वांना नियम सारखेच आहे. असे अजित पवार म्हणाले.

आपल्या कार्यकर्त्यांवर अन्याय झाला तर मी जीवाचे रान करेल. त्याच्या पाठिशी उभा राहील. पण तोच जर चुकीचा असेल तर मी त्याच्यावर पांघरुण घालणार. पांघरुन संपतील. त्यामुळे तसे काही होणार नाही. पण, आपल्याला काय हे जमले नाही, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: