fbpx

वेदांत प्रकल्पावर आदित्य ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावं – कृषीमंत्री अब्दुल सत्तार

पुणे : वेदांत फॉक्सकॉन प्रोजेक्ट गुजरातला गेल्यामुळे महाराष्ट्रातील रोजगार पळवल्याचे आरोप प्रत्यारोप सुरू आहे. त्यातच आता मुंबईतील वांद्रे-अंधेरी सी लिंक कामासंबंधीच्या मुलाखती या देखील चेन्नईमध्ये घेतल्या जात असल्याचा खुलासा शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे यांनी केला. त्यामुळे भूमीपुत्रांच काय? असा सवाल उपस्थित करीत मुख्यमंत्र्यांनी राजकारणापेक्षा विकास कामांवर लक्ष द्यावे असही खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यां वर केली आहे. त्यावर आश्चर्य वाटतंय, गुजरात सरकारने ज्या सुविधा त्या आपण द्यायला हव्या होत्या. खरंतर आधीच्या सरकारमध्ये मी होतो.आदित्य ठाकरे होते. सामूहिक जबाबदारी होती. आम्ही कमी पडलो. मागच्या सरकारनं 2 वर्ष काहीच केले नाही. माजी मंत्री सुभाष देसाई आमचाही रामराम घेत नव्हते. आदित्य ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावं.अशी टीका कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे यांच्यावर केली आहे.

अब्दुल सत्तार म्हणाले, शेतकरी आत्महत्या होणार नाही यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, कमिटी बसवणार आहोत. शेतकऱ्यांना काय अडचणी येतात ते जाणून घेणार आहोत. असे अब्दुल सत्तार म्हणाले.

फॉक्सकॉन प्रकल्प जर महाराष्ट्रात झाला असता तर मला निश्चित आनंद झाला असता. त्यासाठी जागाही ठरली होती. नव्या पिढीला काम करण्याची अधिक संधी मिळाली असती. त्यामुळे तो प्रकल्प इथे होणे गरजेचे होते.आता तो प्रकल्प गुजरातला गेला तरी शेवटी या देशात तो कुठेतरी होतो ही गोष्ट मला मान्य आहे. त्यामुळे केवळ विरोधासाठी विरोधी भूमिका घेणार नाही. खरं तर राज्य सरकारने एक गुंतवणुकीचे वातावरण केले पाहिजे. त्यावर अब्दुल सत्तार म्हणाले,शरद पवार मोठे नेते मी बोलणे उचित होणार नाही.डॉक्टर, इंजिनियर, उद्योग करतील पण यापैकी
काहीच नाही झाला तर शेती करावीच लागेल ना?
हे वाया जाणारे शिक्षण नाही. असा सवाल मुख्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शरद पवार यांना उपस्थित केला.

Leave a Reply

%d bloggers like this: