Sunday, June 21, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करावा; ‘डुप्लिकेट’ मुख्यमंत्र्यांची उच्च न्यायालयात धाव

पुणे : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारखे दिसणारे विजय माने त्यांच्या विरोधात पुणे पोलिसांनी दाखल केलेला गुन्हा रद्द करण्यात यावा याकरिता विजय माने यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. तसेच त्यांनी याचिकेत असे म्हटले आहे की कुठलेही ठोस पुरावे न देता त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांना पोलिसांनी सांगितले होते की जर तुम्हाला कुठल्याही कारवाईपासून दूर राहायचे असेल तर तुम्ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसारखे न दिसण्यासाठी तुमची दाढी आणि राहणीमानामध्ये बदल करा. या विरोधात देखील याचिकेत पोलिसांविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या प्रकरणात विजय माने यांना मानसिक त्रास झाला. त्यासाठी आर्थिक नुकसान झाल्यामुळे त्यांना एक लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी या प्रकरणातील वकील असीम सरोदे यांनी याचिकेद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखा दिसत असल्याने पुण्यात हवा करत असलेल्या तरुणावर पुणे पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. विजय नंदकुमार माने याच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे फोटो गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत होते. आताही त्याने शिंदेंसारखाच पोशाख परिधान करून सऱ्हाईत गुन्हेगार शरद मोहोळ सोबत फोटो सेशन केले होते. पोलिसांनी यावरून गुन्हा दाखल करताच. तो मी नव्हेच अशी भूमिका माने याने मांडली होती.

विजय माने हा नियमितपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारखी वेशभूषा व पोषाख करुन समाजात वेगवेगळ्या कार्यक्रमात सार्वजनिक ठिकाणी जाऊन लोकांचा गैरसमज व्हावा, अशा पद्धतीने वावरत होता. लोकांची जाणीवपूर्वक दिशाभूल करण्याचा प्रयत्न विजय माने व इतरांनी करुन मुख्यमंत्री शिंदे यांची प्रतिमा मलीन करण्यासाठी सराईत गुन्हेगारासोबत फोटो सोशल मीडियात व्हायरल करुन गैरसमज पसरविल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. बंडगार्डन पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायदान्वये गुन्हा दाखल केला असून पोलीस निरीक्षक बालाजी पांढरे अधिक तपास करीत आहेत

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading