fbpx
Saturday, December 2, 2023
Latest NewsPUNETOP NEWS

निर्मला सीतारामन यांचा बारामती दौरा राजकीय नाही – हर्षवर्धन पाटील

पुणे: राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विजय मिळविण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या महत्त्वाकांक्षी ‘मिशन बारामती’ला आज पासून पुण्यात प्रारंभ झाला आहे.त्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज पुण्यात आल्या आहेत.
बारामती मतदार संघाचा दौरा करणार आहेत.या दौऱ्यात बारामती मतदार संघातील विविध ठिकाणी सीतारामन हे गाठीभेटी तसेच विविध कार्यक्रम घेणार आहे.त्यांचा हा जो दौरा आहे .तो राजकीय
दौरा आहे असे सगळे म्हणत आहेत.यावर
केंद्र सरकारच्या विविध ज्या योजना आहे.त्या योजनांचा बारामती लोकसभा मतदार संघात कश्या पद्धतीने उपयोग केला जाऊ शकतो.या संदर्भात हा दौरा आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा बारामती दौरा हा राजकीय दौरा नाही अस स्पष्ठ मत माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी व्यक्त केलं आहे.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूट येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी ते बोलत होते.
केंद्रीय नेतृत्वाने अस ठरवल आहे की देशातील 140 लोकसभा मतदार संघात केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी कशी होते.काय त्रुटी आहे.काय केलं पाहिजे यासाठी केंद्रीय मंत्री त्या त्या मतदार संघात जाऊन केंद्रीय योजनांचा आढावा घेणार आहे.या दौऱ्यात बारामती मतदार संघात जी विकास कामे रखडलेली आहे.जी विकास कामे होत नाहीये.अश्या साठी निधी उपलब्ध करण्याचा आमचं प्रयत्न असणार आहे.अस यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले.
भाजप यंदाच्या लोकसभेत बारामती काबीज करणार का याबाबत हर्षवर्धन पाटील यांना विचारल असता ते म्हणाले की लोकसभेच्या निवडणुकीला 18 महिन्यांचं कालावधी आहे.शेवटच्या 3 महिन्यात इलेक्शन फिवर तयार होतो इतक्या लवकर होत नाही.केंद्राने फक्त केंद्रीय मंत्र्यांना देशातील 140 लोकसभा मतदार संघात केंद्रीय योजनांच्या बाबतीत आढावा घेण्यासाठी पाठवल आहे.आणि हे आमच्या साठी अभिमानाची बाब आहे की केंद्रीय अर्थमंत्री 3 दिवस बारामतीतील गाववस्तीत आढावा घेणार आहे.अस देखील यावेळी पाटील म्हणाले.

Leave a Reply

%d bloggers like this: