fbpx

राज्य सिनियर टेनिक्वाईट स्पर्धेत पुणे जिल्ह्यास सर्वसाधारण विजेतेपद


पुण्याचा प्रथमेश ढवळे आणि मनस्वी आंदुरकर सुवर्णपदक विजेते

पुणे : ४६ वी राज्यस्तरीय गट स्पर्धा बारामती येथे संपन्न झाली.स्पर्धेमधे पुण्याच्या संघाने,सांघिक,व वैयक्तिक सर्व गटात विजेतेपद संपादून एक विक्रम केला.पुरुष गटात तसेच महिला गटात सांघिक विजेतेपद मिळविले तसेच वैयक्तिक पुरुष एकेरी महिला दुहेरी व मिश्र दुहेरीत सर्व गटात विजेतेपद संपादन करून सर्वसाधारण विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.स्पर्धेचा बक्षिस समारंभ मा श्री महेश रोकडे, मुख्याधिकारी, बारामती नगर परिषद तसेच मा.रविंद्रदादा थोरात,मा श्री राजेन्द्र खोमणे, अध्यक्ष, बारामती तालुका क्रीडा शिक्षक संघटना यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुणे श्री महेश चावले क्रीडा अधिकारी बारामती उपस्थित होते.प्रास्ताविक श्री अनिल वरपे (सचिव महाराष्ट्र टेनिक्वाईट असोसिएशन) यांनी केले.

स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे
सांघिक पुरुष १) पुणे जिल्हा २) भंडारा जिल्हा३) नागपूर शहर ४) नंदुरबार जिल्हा
महिला- १) पुणे जिल्हा २) नागपूर ग्रामीण ३) भंडारा जिल्हा ४) उस्मानाबाद जिल्हा
वैयक्तिक पुरुष एकेरी -१) प्रथमेश ढवळे पुणे जिल्हा २) रोहित बोरगावे पुणे जिल्हा ३)संजय चेटुले भंडारा जिल्हा ४)तेजस दानेकर सांगली जिल्हा
वैयक्तिक महिला एकेरी -१) मनस्वी आंदुरकर पुणे जिल्हा २) सिद्धी जाधव. पुणे जिल्हा ३)नंदीनी फेंडर भंडारा जिल्हा ४)झोया शेख भंडारा जिल्हा
पुरुष दुहेरी– १) आदित्य मेस्त्री, साहिल खेडेकर पुणे २) योगेश काढघये,निहाल खोब्रागडे, नागपूर,३) मयूर पाटील, साईराज बडगुजर नंदुरबार ४) गौरव मते संजय सारवे भंडारा
महिला दुहेरी– हर्षदा निगडे सायली जोरी, पुणे २)लावण्या लांजेवार आदिती सारवे भंडारा ३)मृदूला ठाकरे. रुपाली थेरे नागपूर ग्रामीण ४) ओजस्वी गाडे सृष्टी देवकर पिंपरी-चिंचवड
मिश्र दुहेरी १) धीरज गुरव आणि अश्विनी शेंडे पुणे २)अक्षय लुटे आणि तेजल बोरसे भंडारा ३) गणेश गोसावी. आणि भूमिका निगम धुळे ४) ऋत्विक खिस्ते आणि मयूर डाफ नागपूर ग्रामीण
अंतिम सामन्याचे गुणपत्रक – सांघिक पुरुष गट अंतिम फेरी- पुणे विजयी विरुद्ध भंडारा ३–१,१) संजय चेटुले् वि वि साहिल खेडेकर- १०-२१,२१-१७,२१-१४,
प्रथमेश ढवळे वि वि गौरव रुनझुन – २१-११,२१-६
प्रथमेश ढवळे व साहिल खेडेकर वि वि संजय चेटुले व गौरव रूनझुन – २१-१५,२१-१७
प्रथमेश ढवळे वि वि गौरव रुनझुन २१-१२ ,२१-१५
सांघिक महिला गट अंतिम फेरी– पुणे वि वि नागपूर ग्रामीण-३-०
सिध्दी जाधव वि वि. मृदुला ठाकरे- २१-१८,२१-१६
मनस्वी आंदुरकर वि वि आंचल बोंबाटे -२१-१७,२१-२१
सिध्दी जाधव व मनस्वी आंदुरकर वि वि सानिका डाफ व आंचल बोंबाटे – २१-१५,२१-१४
पुरुष एकेरी अंतिम फेरी- प्रथमेश ढवळे वि वि रोहित बोरगावे-२१-१९, १८-२१,२१-१८
पुरुष दुहेरी अंतिम फेरी- आदित्य मेस्त्री व साहिल खेडेकर वि वि योगेश काढघये व निहाल खोब्रागडे- २१-१९,२१-१८
महिला एकेरी अंतिम फेरी- मनस्वी आंदुरकर वि वि सिध्दी जाधव- २१-१८,२१-१९
महिला दुहेरी अंतिम फेरी- हर्षदा निगडे व सायली जोरी वि वि लावण्या लांजेवार व आदिती सारवे-२१-१६,१६-२१,२१-१९
मिश्र दुहेरी अंतिम फेरी- धिरज गुरव व अश्विनी शेंडे वि वि अक्षय लुटे व तेजल बोरसे – २१–१९,२१-१८

Leave a Reply

%d bloggers like this: