fbpx

28 वा पुणे नवरात्र महोत्सव 26 सप्टेंबर पासून

पुणे: कला, गायन ,वादन ,संगीत यांचा अनोखा मिलाख असणारा पुणे नवरात्र महोत्सव यंदा सोमवार दिनांक 26 सप्टेंबर 2022 रोजी सायंकाळी पाच वाजता श्री गणेश कला क्रीडा रंगमंच स्वारगेट येथे संपन्न होत असून. उद्घाटन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते होत आहे. अशी माहिती पुण्यातील पत्रकार परिषदेत पुणे नवरात्र महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी दिली.
या पत्रकार परिषदेला जयश्री बागुल, अमित बागुल, रमेश भंडारी, जयवंत जगताप, कपिल बागुल उपस्थित होते.
या उद्घाटन सोहळ्यात माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार गिरीश बापट ,खासदार वंदना चव्हाण , उदय जाधव, आमदार संग्राम थोपटे, आमदार माधुरी मिसाळ प्रदेश काँग्रेस
उपाध्यक्ष रमेश बागवे, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष मोहन जोशी,माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, काँग्रेसचे अध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार दीप्ती चौधरी, माजी महापौर कमल व्यवहारे,  पुनित बालन, उद्योजक विशाल चोरडिया आहे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमात विभागीय आयुक्त सौरभ राव, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. नवरात्रीनिमित्त पूजा बिरारी, पूर्वा शिंदे, भार्गवी चिरमुले, मीरा जोशी, गौरी कुलकर्णी, तेजा देवकर, वैशाली जाधव ,नुपूर देवकर या नऊ चित्र तारका उद्घाटन सोहळ्यात रंगमंचावर विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवतील.या नामवंत नऊ अभिनेत्री एकाच वेळी एका रंगमंचावर पाहण्याची दुर्मिळ रसिक प्रेक्षकांना आहे. अशी माहिती आबा बागुल यांनी दिली.

यंदाच्या पुणे नवरात्रौ महोत्सवात नऊ सिनेतारकांचा नृत्यविष्कार, महंमद रफी यांची अजरामर गीते, आर. डी. बर्मन यांची बहारदार गाणी, अभिनेते गिरीष ओक यांच्याशी गप्पा, हिंदी सुफी संगीत, तब्बल बारा तासांचा भरगच्च धडाकेबाज लावणी महोत्सव, शास्त्रीय संगीताची ताल यात्रा मैफल, भारतरत्न स्वरसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर यांना त्यांच्या अविट गीतांमधून श्रद्धांजली असे अनेक दर्जेदार कार्यक्रम हे रसिक प्रेक्षकांना मेजवानीच ठरणार आहेत.

दरवर्षी प्रमाणे यंदाही शिवदर्शन येथील श्री लक्ष्मीमाता मंदिरात 26 सप्टेंबर या घटस्थापनेच्या दिवशी सकाळी 6.30 वाजता पुणे नवरात्रौ महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागूल व जयश्री बागूल विधीवत घटस्थापना करतील. याचे पौरोहित्य वेदमूर्ती पं. दंडवते गुरूजी करणार आहेत.

समाजातील विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना पुणे नवरात्रौ महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात दरवर्षी श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविले जाते. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, ज्येष्ठ अभिनेत्री निशीगंधा वाड, पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, अभिनेते – दिग्दर्शक प्रवीण तरडे आणि सामाजिक नेते अ‍ॅड. अंकूश काकडे यांना श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार देऊन यंदा गौरविण्यात येणार आहे. यावेळी लावणी सम्राज्ञी प्रियांका गौतम यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येईल. 

Leave a Reply

%d bloggers like this: