fbpx

मानसिक व शारीरिक आरोग्य हीच खरी संपत्ती- यश बिर्ला

पुणे : उद्योग ,व्यवसायाबरोबरच सर्वांनी मानसिक व शारीरिक आरोग्य जपले पाहिजे तीच आज काळाची गरज आहे असे मत प्रसिध्द युवा उद्योजक यश बिर्ला यांनी व्यक्त केले आज पुण्यात फिक्की महिला उद्योजिका परिषद आयोजित करण्यात आली होती .त्यावेळी ते बोलत होते .

भारतातील प्रमुख उद्योजक बिर्ला कुटुंबातील एक यश बिर्ला हे आहेत .त्यांना नुकताच आंतरराष्ट्रीय फिटनेस बाबत पुरस्कार ही मिळाला आहे .उद्योग ,व्यवसायाबरोबरच फिटनेस मध्येही ते अग्रेसर आहेत .
पुढे ते म्हणाले की ,महिला उद्योग व्यवसायात यशाचं शिखर पार करीत आहेत .व्यवसायात अजून यश मिळवण्यासाठी मेहनत ,जिद्द याबरोबरच योगा ,प्राणायाम ही भारतीयांना मिळालेली मोठी देण आहे त्याचे महत्त्व जाणून घेतले पाहिजे .त्यावर आपली मानसिकता आणि शारीरिक फिटनेस अवलंबून आहे.हेच खरे प्रत्येक क्षेत्रात यशस्वी होण्याचा मूळ मंत्र आहे .यावेळी त्यांनी शोभा डे लिखित फिटनेस ऑफ यश बिर्ला या पुस्तकाविषयी माहिती त्यांनी सांगितली .

कार्यक्रमाचे प्रास्ताविक फिक्की महिला आघाडी च्या पुणे अध्यक्षा निलम शेवलेकर यांनी केले .या कार्यक्रमास नीलम सेवलेकर ,सचिव सोनिया राव , नीता कोठारी ,पिंकी राजपाल , हर्षा कोचर,अनिता अग्रवाल ,शर्मिला भिंगारवाला,ज्योती शर्मा ,पुनम बुच यासह फिक्की महिला पदाधिकारी व पुणे शहरतील महीला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .

Leave a Reply

%d bloggers like this: