पीएच.डी प्रवेशासाठी ३० सप्टेंबरपर्यंत करा अर्ज
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: ६ नोव्हेंबर रोजी प्रवेश परीक्षा
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची यंदाच्या शैक्षणिक वर्षाची पीएच.डी प्रवेश परीक्षा ६ नोव्हेंबर रोजी होणार असून यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून करण्यात आली आहे.
पीएच.डी साठी किती जागा विभागनिहाय उपलब्ध आहेत याची माहिती विद्यापीठाने परिपत्रक क्रमांक २६६ मध्ये जाहीर केले आहे. हे परिपत्रक विद्यापीठाच्या संकेस्थळावर उपलब्ध आहे. यासाठी एकूण ३ हजार १८७ जागा उपलब्ध आहेत.
या जागांसाठी सुरुवातीला उमेदवारांनी अर्ज करणे आवश्यक आहे. अर्ज केलेल्या पात्र उमेदवारांची १०० गुणांची परीक्षा घेण्यात येईल, त्यांनतर मुलाखत होऊन त्यानंतर उमेदवारांची निवड केली जाईल. एम. फिल, नेट, पेट २०२१ परीक्षा उत्तीर्ण उमेवारांना ही परीक्षा न देण्याची सवलत देण्यात आली आहे. दरम्यान याविषयीची सविस्तर माहिती http://bcud.unipune.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.