fbpx
Saturday, December 2, 2023
Latest NewsPUNE

ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधील विद्यार्थी व शिक्षकांचे १० पेटेन्ट प्रकाशित

पुणे : केजे एज्युकेशनल ट्रस्ट संचालित ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च (टीसीओईआर) येथील विद्यार्थी व शिक्षकांचे १० पेटंट प्रकाशित झाले आहेत. शैक्षणिक वर्ष २०२१-२२ या वर्षात प्राचार्य डॉ. अभिजित औटी यांच्या पुढाकाराने डेव्हलपमेंट विभागामार्फत विद्यार्थी व शिक्षकांच्या संशोधनाला वाव देत एकूण १० प्रोजेक्ट पेटेंटची प्रक्रिया यशस्वीरित्या करून प्रकाशित करण्यात आली. विद्यार्थी व शिक्षकाच्या एकत्रित प्रयत्नातून झालेल्या या यशस्वी कामगिरीबद्दल केजे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव यांनी अभिनंदन केले.
डॉ. अभिजित औटी व सहकारी आणि विद्यार्थी (वायरलेस फायरींग वेपन फॉर मिलिटरी पर्पज), प्रा. जयश्री सत्रे, सहकारी व विद्यार्थी (रिऍक्टिव्ह पॉवर असेसमेन्ट विथ अँड विदाऊट इलेक्ट्रीकल व्हेईकल चार्जिंग), प्रा. प्रतिभा चव्हाण, सहकारी व विद्यार्थी (मल्टीमॉडेल अप्रोच फॉर अरली डिटेक्शन ऑफ कोविड-१९ युजींग सीएनएन), डॉ. सुजित मोरे, सहकारी व विद्यार्थी (एआय डेक्सटॉप असिस्टंट) व (इमोशन रेकग्नीशन युसींग मशीन लर्निंग), प्रा. गजानन अरसलवाद, सहकारी व विद्यार्थी (ब्लॉकचेन बेस्ड सेक्युअर हेल्थकेअर अप्लिकेशन फॉर कार्डिओडिसीज), प्रा. पंकज फडतरे, सहकारी व विद्यार्थी (स्मार्ट मिरर युजींग एआय अँड आयओटी), प्रा. स्नेहा तीर्थ, सहकारी व विद्यार्थी (लो कॉस्ट टच डिसल्पे मेथड बेस्ड ऑन हॉडलींग प्रोजेक्टर युजींग इमेज प्रोसेसींग), डॉ. गीतीका नारंग, सहकारी व विद्यार्थी (ब्लॉकचेन बेस्ड इलेक्ट्रानिक व्हॅक्सीनेशन रेकार्ड स्टोरींग सिस्टम) आणि प्रा. स्नेहा तीर्थ, रोशनी पासलकर व सहकारी (मेथड अँड प्रोसेस हेल्थकेअर अँड बायो इन्फोसमेटीक्स) यांनी या १० पेटंटची निर्मिती केली आहे.
कल्याण जाधव म्हणाले, “देशाच्या उज्वल भविष्यासाठी व विकासासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. यासाठी विद्यार्थ्यांनी अभियांत्रिकी क्षेत्रात नवनविन तंत्रज्ञानामध्ये विकास व संशोधन करून देशाचे नाव जागतिक स्तरावर उंचवण्यासाठी वाटचाल करणे गरजेचे आहे. विद्यार्थी व शिक्षकांनी मिळवलेले हे यश अभिमानास्पद आहे. संशोधनाला सातत्याने प्रोत्साहन देण्याचे आमचे प्रयत्न आहेत.” संस्थेचे कार्यकारी संचालक मेजर जनरल (निवृत्त) समीर कल्ला यांनीही मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या. अशा संशोधनपर उपक्रमांना प्राधान्य दिले जात असल्याचे डॉ. अभिजित औटी यांनी सांगितले.

Leave a Reply

%d bloggers like this: