fbpx

एमएसएलटीए बी1 आशियाई कुमार टेनिस भारताच्या आठ खेळाडूंचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश 

 
  • जपानच्या तकमासा मिशिरो,  थायलंडच्या सुफावत साओई यांचा मानांकित खेळाडूंवर सनसनाटी विजय


पुणे, 20 सप्टेंबर 2022: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना व डेक्कन जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एमएसएलटीए  बी1 आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत मुलांच्या गटात युवान नांदल, 
आर्यन शहा, मानस धामणे, अमन दहिया यांनी, तर मुलींच्या गटात वैष्णवी आडकर, सुहिता मारुरी, श्रुती अहलावत, सोनल पाटील या  भारतीय खेळाडूंनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या दुस-या फेरीत मुलांच्या गटात जपानच्या तकमासा मिशिरो याने अव्वल मानांकित ऑस्ट्रेलियाच्या हेडन जोन्सचा 6-2, 6-4 असा पराभव करून स्पर्धेतील खळबळजनक निकाल नोंदवला. हा सामना तास मिनिटे चालला. मिशिरोने जागतिक क्रमवारीत ५५व्या स्थानी असलेल्या जोन्सवर सनसनाटी विजय मिळवला. सामन्यात मिशिरोने पहिल्याच गेममध्ये जोन्सची सर्व्हिस रोखली व सामन्यात आघाडी घेतली.  या सेटमध्ये वर्चस्व राखत मिशिरोने जोन्सची पाचव्या, सातव्या गेममध्ये सर्व्हिस भेदली व हा सेट 6-2 असा जिंकून आघाडी घेतली. दुसऱ्या सेटमध्येदेखील मिशिरोने आपला रंगतदार खेळ सुरु ठेवला व या सेटमध्ये पुन्हा पहिल्याच गेममध्ये सर्व्हिस ब्रेक केली व हा सेट जोन्सविरुद्ध 6-4 असा जिंकून विजय मिळवला. थायलंडच्या बिगरमानांकीत सुफावत साओई  याने ऑस्ट्रेलियाच्या सातव्या मानांकित जेरेमी झांगचा 6-2, 6-2 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. भारताच्या सहाव्या मानांकित आर्यन शहायाने क्रिश त्यागीचा 6-4, 3-6, 6-2 असा तीन सेटमध्ये पराभव केला. तिसऱ्या मानांकित युवान नांदल याने बुशन हाओबामचे आव्हान 6-1, 6-2 असे संपुष्टात आणले. पाचव्या मानांकित पुण्याच्या मानस धामणे याने रेथिन प्रणव सेंथिल कुमारवर 4-6, 6-1, 6-2 असा संघर्षपूर्ण विजय मिळवला.  दुसऱ्या मानांकित अमन दहियाने वाईल्ड कार्डद्वारे प्रवेश केलेल्या काहिर वारिकला 6-2, 6-1 असे पराभूत केले.
मुलींच्या गटात पुण्याच्या चौथ्या मानांकित वैष्णवी आडकर हिने साई जान्हवीला  6-2,6-0 असे नमविले. चुरशीच्या लढतीत कोल्हापूरच्या सोनल पाटील हिने कडवी झुंज देत अरुणकुमार लक्ष्मी प्रभाला 0-6, 6-2, 6-4 असा पराभूत करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. पाचव्या मानांकित भारताच्या सुहिता मारुरी  हिने सिंगापूरच्या स्यू यान टॅनचा 5-7,6-2,6-4 असा तर, भारताच्या दुसऱ्या मानांकित श्रुती अहलावतने ऑस्ट्रेलियाच्या रिया मेकेसरचा 6-2, 6-3 असा सरळ सेटमध्ये पराभव केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: एकेरी: (दुसरी फेरी): मुले:
तकमासा मिशिरो (जपान) वि.वि हेडन जोन्स (ऑस्ट्रेलिया) [1] 6-2, 6-4
आर्यन शहा (भारत) [6] वि.वि क्रिश त्यागी (भारत)6-4, 3-6, 6-2;
युवान नांदल (भारत) [3] वि.वि बुशन हाओबाम (भारत) 6-1, 6-2
रिया हत्तोरी (जपान) [8]वि.वि. दक्ष प्रसाद (भारत) 2-6, 6-3, 6-2; 
वूह्युक चांग (कोरीया) [4]वि.वि डेनिम यादव (भारत) 6-2, 6-1; 
सुफावत साओई (थायलंड) वि.वि.जेरेमी झांग (ऑस्ट्रेलिया) [7] 6-2, 6-2; 
 मानस धामणे (भारत) [5]वि.विरेथिन प्रणव सेंथिल कुमार (भारत) 4-6, 6-1, 6-2; 
अमन दहिया (भारत) [2])वि.वि. काहिर वारिक (भारत) 6-2, 6-1; 

मुली:
यू-युन ली (तैपेई) [1] वि.वि ऋषिथा रेड्डी बसिरेड्डी (भारत) 6-2, 6-3;
लिली टेलर(ऑस्ट्रेलिया) [6]  वि.वि.यु किकावा(जपान)6-4, 6-2;
सुहिता मारुरी (भारत) [5] वि.वि स्यू यान टॅन (सिंगापूर)5-7,6-2,6-4
श्रुती अहलावत (भारत) [2] वि.वि. रिया मेकेसर(ऑस्ट्रेलिया) 6-2, 6-3; 
वैष्णवी आडकर (भारत) [4] वि.वि साई जान्हवी(भारत) 6-2,6-0
सोनल पाटील (भारत)वि.वि अरुणकुमार लक्ष्मी प्रभा (भारत)0-6, 6-2, 6-4;
इमर्सन जोन्स (ऑस्ट्रेलिया) [3]वि.वि.शिहो त्सुजिओका (जपान) 6-1, 7-6(2);

Leave a Reply

%d bloggers like this: