…. नाहीतर राजकारण, समाजकारण करायला मजा कशी येणार? – खासदार सुप्रिया सुळे
पुणे : राज्यातील सत्ताबदलानंतर आता यंदाचा शिवसेनाच्या दसरा मेळाव्याची अधिकच चर्चा सुरू झाली आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, मला आठवतं जेव्हा शरद पवार हे मुख्यमंत्री होते. तेव्हा बाळासाहेब ठाकरे हे शिवाजी पार्कवरून हे दिलदारपणे शरद पवारांवर टीका करायचे. विरोधक हा दिलदार असला पाहिजे. नाहीतर राजकारण आणि समाजकारण करायला मजा कशी येणार? असे आज राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पुण्यात एका कार्यक्रमासाठी सुप्रिया सुळे आल्या होत्या. त्यावेळी पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला. त्या म्हणाल्या, दसरा मेळाव्याचा वादा अतिशय भयंकर टोकाला पोहोचला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण हे भरपूर गडूळ होत चालले त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, शरद पवार दहा-पंधरा दिवसांपूर्वी एक गोष्ट बोलले होते. मुख्यमंत्री हे पद खूप मोठं असतं आणि ते सर्वसमावेशक असलं पाहीजे. आमच्याही काळात दसरा मेळावे व्हायचे. अनेक पक्षांचे मेळावे व्हायचे. दिलदारपणे आमच्याविरोधात त्या व्यासपीठांवरून भाषणं व्हायची. आमही उत्सुकतेने किंवा ते आपल्या विरोधात काय बोलत आहेत, हे जाणून घेण्यासाठी बघायचो. त्यामळे मोठा नेता हा केवळ पदाने मोठा होत नाही, तो कर्तृत्वाने होतो आणि दिलदार असतो. मोठ्या पदावर बसणारा नेता हा दिलदार असला पाहिजे. त्यामुळे सध्या जे काही सुरू आहे ते दुर्दैवी आहे. महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारी ही बाब आहे, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
देशाच्या अर्थमंत्री बारामतीत येतायत याचा मला आनंदच आहे
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन त्या 22 ते 24 सप्टेंबरला बारामती दौऱ्यावर येत आहेत. त्यामुळे भाजप बारामती ताब्यात घेणार का. असा प्रश्न सगळ्यांना पडला आहे. त्यावर खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या,देशाच्या अर्थमंत्री निर्मला सितारामन बारामतीत येतायत याचा मला आनंद असून त्यांचे स्वागतच आहे, असे राष्ट्रवादीचे नेत्या व खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच निर्मला सितारामन यांनी कृषी विज्ञान केंद्र आणि इतर संस्था पाहव्यात. यासाठी त्यांना आमंत्रण देण्यात आलय. जर त्यांना वेळ असेल तर मी फिरून त्यांना बारामती दाखवेन, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या.
