23 गावातील विविध प्रलंबित प्रश्नांबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतली पुणे महानगरपालिका आयुक्तांची भेट
पुणे : बारामती लोकसभा मतदार संघातील पुणे महापालिका क्षेत्र अंतर्गत समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन चर्चा केली. त्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
सुप्रिया सुळे म्हणाल्या,प हिले अजित पवार पुण्याचे पालकमंञी असताना पुण्यात दर आठवड्यात आढावा बैठक व्हायची. पण आता सत्ताधारी तसं काहीच करत नाही. त्यामुळे विकासकामं पेंडिंग राहताहेत. तसंच 23 गावातील कचरा आणि पाणी समस्या अजूनही तशीच प्रलंबितआहे.म्हणूनच खासदार या नात्याने पुणे महानगरपालिका आयुक्त विक्रमकुमार यांची भेट घेऊन. या प्रलंबित प्रश्नांचा आढावा घेतला. अशी माहिती खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्रकारांना दिली.
अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यात काही नाराजी निर्माण झाल्याच्या चर्चा मध्यंतरी समोर येत होत्या. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल चर्चा करायला लोकांना खूप आवडतं. अजित पवार आणि जयंत पाटील हे विकासकामात आणि संघटनाबांधणीत इतके व्यस्त असतात की ते दोघेही चर्चांमध्ये फारसा वेळ घालवत नाहीत. म्हणूनच तर पक्षाची कामगिरी एवढी चांगली झाली आहे.
पुण्यात एका झोमॅटो डिलिव्हरी बॉयने तरुणीचे जबरदस्तीनं चुंबन घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. रईस शेख असे झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे नाव असून, त्याला अटक करण्यात आली आहे. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या,डिलिव्हरी बॉयने केलेल्या विनयभंग प्रकरण दुर्दैवी असून पोलिसांनी आरोपीवर कडक कारवाई केली पाहिजे.
