मातृत्वावरील हृदयस्पर्शी कथा ‘दूसरी माँ’
आई-मुलाचे नाते शाश्वत, नि:स्वार्थ आणि बिनशर्त प्रेमावर आधारित असल्याचे मानले जाते. मातृत्व प्रेम व आपुलकीला कोणतीही बंधने नसली तरी ते जटिल असू शकते, विशेषत: तो मुलगा तुमच्या पतीचा अवैध मुलगा असतो तेव्हा अनेक प्रश्न निर्माण होतात. आणि नशीब तुम्हाला त्या मुलासोबत एकाच छताखाली आणते तेव्हा काय घडते? अशीच काहीशी यशोदा व कृष्णाची कथा आहे, ज्यांना नशीब एकत्र आणते आणि त्यांच्या जीवनाला नकळतपणे कलाटणी मिळते. एण्ड टीव्ही नवीन कौटुंबिक मालिका ‘दूसरी माँ ‘सादर करण्यास सज्ज आहे. या मालिकेची निर्मिती झी स्टुडिओजने आणि सह-निर्मिती इम्तियाज पंजाबी यांनी केली आहे. मालिकेमध्ये पुन्हा टेलिव्हिजनवरील लोकप्रिय आई-मुलाची जोडी पाहायला मिळेल – यशोदाच्या भूमिकेत नेहा जोशी व कृष्णाच्या भूमिकेत आयुध भानुशाली आहेत. तसेच इतर स्टार कलाकार देखील प्रमुख भूमिकेत आहेत. मालिका रात्री ८ वाजता एण्ड टीव्हीवर सुरू होत आहे आणि दर सोमवार ते शुक्रवार प्रसारित होईल.
या मालिकेबाबत सांगताना एण्ड टीव्हीचे व्यवसाय प्रमुख विष्णू शंकर म्हणाले, ‘’आईचे प्रेम हे नेहमी बिनशर्त , निस्वार्थ व त्यागाचे प्रतीक आहे आणि मुलांसोबतचे त्यांचे नाते निर्विवाद असते. पण या नात्यामुळे जीवनाला कलाटणी मिळते तेव्हा काय घडते? आमची मालिका ‘दूसरी माँ’ स्वाभिमान व मातृत्व यामध्ये संघर्ष करणा-या यशोदाची हृदयस्पर्शी कथा आहे. ’’.
झी स्टुडिओजचे चीफ बिझनेस ऑफिसर अंशुल खुल्लार म्हणाले, “दूसरी माँ ही प्रमुख पात्र यशोदेच्या अवतीभोवती फिरणारी कौटुंबिक मालिका आहे. ती तिच्या पतीचा भूतकाळ आणि तिचा सावत्र मुलगा कृष्णासोबतच्या विवादित नात्याचा सामना करते. कथानक यशोदेच्या दुविधेला सुरेखरित्या सादर करते. ती अन्याय झालेल्या पत्नीच्या वेदना आणि तिचा सावत्र मुलगा कृष्णाच्या दुर्दशेबाबत सहानुभूतीमध्ये अडकली आहे. कृष्णाने त्याची आई गमावली आहे आणि ख-या वडिलांकडून स्वीकार होण्यासाठी धडपडत आहे.’’
सह-निर्माता व दिग्दर्शक इम्तियाज पंजाबी म्हणाले, “दूसरी माँ हि मालिका महिला व मातेची लक्षवेधक कथा आहे. उत्तर प्रदेशमध्ये स्थित कथानक यशोदा व कृष्णाच्या जीवनप्रवासाला सादर करते आणि हा रोमांचक ड्रामा प्रेक्षकांचे प्रत्येक सीनकडे लक्ष वेधून घेईल ’’.
नेहा जोशी म्हणाल्या, ” यशोदा समर्पित गृहिणी व सामाजिक कार्यकर्ती आहे. ती प्रेमळ, व्यावहारिक महिला आहे. तिला दोन मुली आहेत आणि तिला त्यांचा अभिमान आहे. ती कोणाचाही अनादर करत नाही, पण कोणाकडूनही अपमान झालेला ती सहन करत नाही ती स्वाभिमानी आहे. ती लोकांना तिच्या अनोख्या पद्धतीने व हुशारीने त्यांच्या चुकांची जाणीव करून देते. कामादरम्यान ती एकदा अविवाहित असलेली आई ‘ माला‘ला भेटते, जी मृत्यूच्या टप्प्यावर असते. यशोदा मालाला तिचा एकमेव मुलगा कृष्णाची काळजी घेण्याचे आणि त्याचे भविष्य सुनिश्चित करण्याचे वचन देते.’’
आयुध भानुशाली म्हणाला, “कृष्णा हा यशोदेचा पती अशोक व मालाचा मुलगा आहे. तो खूप निरागस आहे. तो त्याच्या आईसोबत राहतो आणि त्याच्यासाठी ती विश्व आहे. आपल्या आईला गमावल्यानंतर कृष्णाला खूप राग येतो आणि तो त्याच्या अज्ञात वडिलांबाबत, मोठ्या प्रमाणात संपूर्ण जगासह यशोदाचा तिरस्कार करू लागतो. तो त्याच्या आईला वाचवण्याचे आणि त्याची काळजी घेण्याचे खोटे वचन देण्यासाठी यशोदाला दोषी ठरवतो..’’
